Corona-Patient 
पुणे

पुणेकरांनो, महापालिकेच्या 'या' 9 रुग्णालयांत घ्या कोरोनाचे उपचार; तेही अगदी मोफत!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी, त्याला सामोरे जाण्यासाठी पुणे महापालिका प्रशासाने जोरात तयारी सुरू केली आहे. सध्या 2700 रुग्णांवर उपचार करण्याची महापालिकेची क्षमता असून 1600 रुग्ण दाखल झाले आहेत. आणखी 4 हजार रुग्ण दाखल करून घेण्याची तयारी महापालिकेने केली आहे.

कोरोनाचा सामना करण्यासाठी महापालिकेने गेल्या काही दिवसांपासून जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी खासगी रुग्णालयांचीही मदत घेण्यात येत असून काही वसतिगृहेही महापलिकेने ताब्यात घेतली आहेत. महापालिकेच्या 9 रुग्णालयांत सध्या दाखल झालेल्या 918 रुग्णांवर औषधांसह मोफत उपचार सुरू आहेत.

कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण या रुग्णालयांत थेट जाऊन उपचार घेऊ शकतात, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.  

'या' रुग्णालयांत रुग्णांवर होणार मोफत उपचार (कंसात रुग्ण क्षमता) :

- निकमार, बालेवाडी - 1000
- सिंहगड कॉलेज होस्टेल, वडगाव बुद्रूक - 900
- सिंहगड कॉलेज, कोंढवा - 327
- ट्रिनिटी कॉलेज, कोंढवा - 220
- सणस मैदान वसतिगृह - 125
- नायडू सांसर्गिक रुग्णालय - 120
- महापालिका दवाखाना, रक्षकनगर, खराडी - 90
- द्रोपदीबाई खेडेकर दवाखाना, बोपोडी - 50
- मुरलीधर लायगुडे रुग्णालय, सिंहगड रोड - 50

''महापालिकेच्या 9 रुग्णांलयांत कोरोनाच्या रुग्णांवर मोफत उपचार सुरू आहेत. सध्या सुमारे 3 हजार रुग्णांवर उपचार करण्याची महापालिकेची क्षमता आहे. गरजेनुसार ही क्षमता 7 हजारांपर्यंत करण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे.''
- डॉ. संजीव वावरे, सहआरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Intercity: पुणे-मुंबई इंटरसिटीच्या डबे वाढवण्याला ‘ब्रेक’; फलाट आणि पिट लाइन अपुरी, प्रवाशांना नाहक फटका

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी शेतकऱ्यांच्या शेतात याल, तर दरोडेखोरांप्रमाणेच वागणूक देऊन चोप देऊ; राजू शेट्टींचा थेट इशारा

AI Healthcare Breakthrough: जगात पहिल्यांदाच AIच्या मदतीने मेंदूची शस्त्रक्रिया; रुग्णाची दृष्टी वाचवण्यात यश

BJP woman leader daughter in law : भाजप महिला नेत्याच्या सुनेने उचलले टोकाचे पाऊल; अंतर्वस्त्रांमध्ये सापडली चिठ्ठी, विवाहबाह्य संबंधांचा आरोप

लता मंगेशकरांचं ते अजरामर गाणं, जे गाताना डोळ्यात आले होते अश्रू; 67 वर्षांनंतरही रक्षाबंधनाला प्रत्येक भाऊ-बहिणीला करतं भावुक!

SCROLL FOR NEXT