पुणे : एक सप्टेंबरपासून प्रथम वर्ष तर एक ऑगस्टपासून इतर वर्षाचे वर्ग ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यासाठी महाविद्यालयांनी पूर्वतयारी करावी. तसेच हे शिक्षण कसे दिले जाणार आहे, याचा आराखडा तयार करा, असे आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना दिले आहेत.
- धक्कादायक : पुण्यात दोन महिन्यांच्या बाळाचा कोरोनाने मृत्यू; घटना दडवली
विद्यापीठ अनुदान आयोग व महाराष्ट्र शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे यंदाचे शैक्षणिक एक सप्टेंबरपासून सुरू केले जाणार आहे. त्यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी मुडल अथवा गुगल, क्लास रूम, ई-लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिमचा वापर करून शिक्षणाची प्रक्रिया सुरू करण्याची पूर्वतयारी करावी. त्यासाठी आराखडा तयार करून त्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. एक ऑगस्टपूर्वी अशा प्रकारची चाचपणी करून विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आणि अडचणी समजून घ्याव्यात. त्यामुळे शिकवताना अडचणी येणार नाहीत, असे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाने परिपत्रकात नमूद केले आहे.
- पुणे : १५ जूनपासून कडक लॉकडाउन अमलात येणार? महापालिका आयुक्त म्हणतात...!
महाविद्यालयाने ही तयारी करावी
- शिक्षकांनी इ-कंटेट, नवनी अभ्यासक्रम अंमलबजावणीसाठी पूर्वतयारी जुनच्या उत्तरार्थ आणि जुलै महिन्यात करावी.
- संयुक्त पद्धतीने शिकवण्यासाठी विद्यार्थी संख्येनुसार बॅच कराव्यात
- बॅचेस यासाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान उपलब्ध करावेत
- विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असणार्या साधनांद्वारे अभ्यास करून घ्यावा
- प्रत्येक विद्यार्थी या प्रक्रियेत सहभागी व्हावा यासाठी पूर्वतयारी आवश्यक.
- कोरोनामुळे जामीनावर सुटलेल्या कैद्यांनी वाढवली पोलिसांची डोकेदुखी!
प्रतिबंधीत क्षेत्रासाठी सवलत
जी महाविद्यालये, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी प्रतिबंधित क्षेत्रात आहेत त्यांना "वर्क फार्म होम'ची सुविधा उपलब्ध करून द्यावी. या शिक्षकांनी घरून आवश्यकतेनुसार काम करणे आवश्यक आहे. अशा कर्मचाऱ्यांची सत्राच्या प्रथम दिवशी हजेरीपत्रकावर स्वाक्षरी करणे सक्तीचे करू नये, अशा स्पष्ट सूचना ही देण्यात आल्या आहेत.
पुण्यातील मार्केट यार्डाबाबत महत्वाचे अपडेट; वाचा सविस्तर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.