pune.jpg 
पुणे

महत्वाची बातमी : पुणे विद्यापीठाचा परिक्षांबाबत मोठा निर्णय; काय झाला वाचा सविस्तर

सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्य सरकारने दिलेल्या निर्देशाप्रमाणे अंतीम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यानंतरच परीक्षा कशी हे स्पष्ट होणार आहे.

राज्य सरकारने उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या परीक्षा संदर्भात आज (ता. ८) धोरण स्पष्ट केले. यामध्ये केवळ अंतिम वर्षाच्या व अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार असल्याचे जाहीर केले. तर प्रथम, व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मुल्यांकनावर आधारीत गुण देऊन उत्तीर्ण केले जाणार आहे. - दारु विकत घेणाऱ्यांची चेष्टा करताय, मोबाइलवर त्यांचे फोटो काढताय...तर ही बातमी वाचाच!

दरम्यान, पुणे विद्यापीठाचे पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यात सुमारे साडे सात लाख विद्यार्थी दरवर्षी परीक्षा देतात. त्यापैकी किमान १ ते सव्वा लाख विद्यार्थी अंतिम वर्षात शिक्षण घेत आहेत. सोशल डिस्टसिंगचा विचार करून त्यांच्या परीक्षा विद्यापीठाला घ्यायच्या आहेत. 

राज्य सरकारने निर्णय जाहीर केला असला तरी त्याचे परिपत्रक आल्यावर यासंदर्भात बैठका सुरू होतील. तसेच विद्यापीठ कायद्यानुसार योग्य निर्णय घेऊन नियोजन करावे लागेल. परीक्षा मंडळाच्या बैठकीत मान्यता घेतल्यावरच वेळपत्रक व परीक्षा कशा होणार हे जाहीर केले जाईल. यासाठी किमान तीन चार दिवस लागतील, असे सुत्रांनी सांगितले. 

दरम्यान, कुलगुरू डाॅ. नितीन करमळकर यांनी याबाबत निवेदन जाहीर केले आहे. "विद्यापीठांच्या परीक्षांबाबत 'यूजीसी' आणि राज्य शासनाने केलेल्या घोषणेनुसार पुणे विद्यापीठाचे नियोजन सुरू आहे. परीक्षांबाबत घेतलेल्या निर्णयांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी, त्यांचा परीक्षांबाबत संभ्रम दूर करण्यासाठी तसेच, तणावाच्या या काळात विद्यार्थ्यांचे योग्य ते समुपदेशन करण्यासाठी जिल्हानिहाय व्यवस्था करण्यात येत आहे. पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात घ्यावयाच्या परीक्षांबाबत सविस्तर कृतिआराखडा तयार करण्यात येत आहे.' असे करमळकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: बापरे! सोनं 84,000 हजारांनी महागलं; 4 दिवसांत मोठी वाढ; आता किती रुपयांना मिळतंय?

Katraj Dairy Milk Price: कात्रज डेअरीच्या दूध दरात वाढ; दुग्धजन्य पदार्थही महागणार... किती पैसे मोजावे लागणार?

Kolhapur Ganeshotsav : 'कोल्हापूरच्या राजा'चे जल्लोषात आगमन! 40 हून अधिक ड्रोन अन् ढोल-ताशांच्या गजराने आसमंत दुमदुमला, भाविकांची अलोट गर्दी

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीवर हसन मुश्रीफ काय म्हणाले

भारतीय संघाचे वर्तमान अन् भविष्य संकटात! एक, दोन नव्हे तर १३ खेळाडू जखमी; BCCI च्या गोटातून समोर आली धक्कादायक माहिती...

SCROLL FOR NEXT