pune university square traffic Sakal
पुणे

विद्यापीठ चौकातील वाहतूकीसाठी अनगळवाडीतील रस्ता खुला करण्यास रहिवाशांचा विरोध

रहिवाशांना दोन मिनिटांच्या रस्त्यावर जाण्यासाठी लागणार दोन तास

समाधान काटे

शिवाजीनगर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Pune University) चौकामध्ये होणाऱ्या एकात्मिक दुमजली उड्डाणपूलाच्या बांधकामासाठी वाहतूकीत बदल करण्यात येत असताना, सेनापती बापट रस्त्यावरून (Senapati Bapat road) विद्यापीठ चौकाकडे येणारी दूचाकी वाहणे अनगळवाडी, गणपती मंदीराच्या पाठीमागे, मॉडर्न शाळेच्या मैदानावरून पाषाण रस्त्यावर वळवली जाणार आहेत.

या संदर्भात पुणे महापालिकेने रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू केले असून,या भागात असलेल्या अनगळ पार्क, नॉव्हेल्टी हेरिटेज, नॉव्हेल्टी सोसायटी, श्रेयस अपार्टमेंट, फ्रेंड्स पार्क या विविध सोसायट्या मध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी रस्ता खुला करण्यास विरोध दर्शवला आहे.सध्या या रहिवाशांना सेनापती बापट रस्त्यावर येण्यासाठी दोन ते तीन मिनिटे वेळ लागतो.

परंतू अनगळवाडी येथील रस्ता दूचाकी वाहतूकीसाठी खुला केला तर रहिवाशांना सेनापती बापट रस्त्यावर येण्यासाठी वाहतूक कोंडीत पाषाण रस्त्यावर अभिमानश्री सोसायटीकडे जाऊन, विद्यापीठ चौकाला वळसा घालून, दीड ते दोन तासने सेनापती बापट रस्त्यावर यावं लागणार आहे. यामुळे जवळपास दोनशे कुटुंबाला याचा त्रास होणार असल्याने रस्ता खुला करू नये असे निवेदन चतुःश्रृंगी नागरिक कृती समितीच्या वतीने रहिवाशांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे.

आम्ही कधीच पुणे शहराच्या प्रगतीच्या आडवे येत नाही, येणार पण नाही.आमची सोसायटी जवळपास पस्तीस वर्षे जुनी आहे. वयोवृद्ध, लहान मुलं, महिला, हृदयविकाराचे रुग्ण वगैरे राहतात.दवाखण्यात, मेडिकल, भाजीपाला,किराणा, दूध आणायला जाण्यासाठी आम्ही कसे जायचं? आगोदर कल्पना दिली गेली नाही, रस्ता रुंद असल्याने गैरसोय होणार आहे.

-चेअरमन, नॉव्हेल्टी हेरिटेज सोसायटी, मोहन पाटील.

मॉडर्न शाळेच्या मैदानावरून रस्ता काढणार आहेत,ते किती धोकादायक आहे.या बाबतीत प्रशासनाचे शून्य नियोजन दिसते, मेट्रो नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणतायत की असुविधेसाठी विकासाच्या नावाखाली काहीही करणार का? या भागातील नागरिकांना दोन वर्षापासून जास्त समस्या भेडसावू लागल्या आहेत. हा रहदारीचा रस्ता नाही. गणपती मंदिराच्या समोरील बाजूने वाहणे जाऊ शकतात. आमच्या तक्रारीची दखल घ्यावी.

-स्थानिक रहिवासी, अनगळवाडी नंदकुमार अनगळ.

रहिवाशांच्या दैनंदिन,व्यक्तीगत जीवनावरती अडचण निर्माण होणार आहे.इतर कोणताही पर्यायी रस्त्याचा प्रस्ताव न ठेवल्याने या तुघलकी निर्णयाविरुद्ध रहिवाशांचा वाहतूकीला विरोध राहणार आहे.विकास कामाला कोणताही अडथळा करणे हा उद्देश नसून दैनंदिन जीवनावरती अडचणी निर्माण होणऱ्या पर्यायी वाहतूक बदलला विरोध राहील.

- शहराध्यक्ष मनसे जनहित कक्ष, नरेंद्र तांबोळी.

दोन आठवड्यापासून प्रशासनाशी चर्चा सुरू आहे.आम्ही त्यांना कळवले आहे की शक्य तो करू नका.शिक्षक, विद्यार्थी,पालक, लहान मुलं यांच्या सुरक्षेचा प्रश्न येतो.या संदर्भात खासदार गिरीश बापट यांच्याशी देखील बोलणं झालं आहे सोमवारी महापालिका आयुक्तांना मी भेटणार आहे.प्रत्यक्ष रस्ता कुठून काढायचा यावरती प्रशासनाची दोन मतं आहेत.आम्ही त्यामध्ये सुचना सुचवल्या आहेत.पुढील आठवड्यात चर्चेला मुर्त स्वरुप येईल.रस्ता खुला करु नये म्हणून पुर्वीच जवळपास एक हजार पालकांनी आयुक्तांना पत्र दिले आहे.

- कार्याध्यक्ष प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी डॉ.गजानन एकबोटे

डी.पी मध्ये पंचेचाळीस मीटरचा रस्ता असून महापालिकेच्या ताब्यात घेऊन वाहतूकीसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.म्हणजे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाचे काम करता येईल.पुलाचे काम होईपर्यंत वाहतूकीचे नियोजन करता येईल.स्थानिकांचा विरोध रस्त्याला नाही,ऐकेरी वाहतूकीला आहे.

- उपायुक्त महापालिका मालमत्ता विभाग, राजेंद्र मुठे

मोठे प्रकल्प करत असताना सार्वजनिक विचार करावा लागतो.कोणताही रस्ता केला तर कोणाचीतरी थोडी गैरसोय होणार आहे.यावरती कायमचा पर्याय नाही.मॉडर्न शाळेतील विद्यार्थ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने विचार करून शाळेच्या आवारात आवाज अडथळे, पादचारी पूल बनवणार आहोत.विद्यार्थांची सुरक्षा धोक्यात आणून काही करणार नाही.प्रत्येकाला काही दिवस सहन करावं लागेल, याला इलाज नाही.लवकरात - लवकर विद्यापीठ चौकातील पूलाचे काम करणार आहोत.दीड ते दोन वर्षाचा कालावधी आहे, दिवस, रात्र काम करुन नागरिकांना कमी त्रास होईल यांचा विचार केला जाईल.

जवळपास पंधरा हजार दूचाकी या रस्त्यावर येतात,त्या सगळ्यांचा विचार करता काही लोकांची गैरसोय होईल.शाळेच्या मैदानावरुन जाणारी उच्च दाबाची वीज वाहिनी भूमिगत केली जाणार आहे.

- महानगर आयुक्त, डॉ. सुहास दिवसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT