Students 
पुणे

Breaking: विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा; पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढील महिन्यापासून सुरू होणार

ब्रिजमोहन पाटील

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर पदवीच्या प्रथम सत्राची परीक्षा १५ मार्च पासून ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ही परीक्षा ऑनलाइन होणार असली तरी ती विद्यार्थ्यांच्या मोबाईल, लॅपटॉपवर होणार की महाविद्यालय स्तरावर याचा निर्णय उपसमितीचा अहवाल आल्यानंतर पुढील तीन ते चार दिवसात स्पष्ट होणार आहे.

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची बैठक मंगळवारी (ता.९) पार पडली. त्यामध्ये गुणवत्ता, गैरप्रकारांना रोखणे, विद्यार्थ्यांची सोय याचा विचार करून परीक्षेचे नियोजन केले जाणार आहे. द्वितीय वर्ष ते अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा १५ मार्च पासून सुरू होतील, तर प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ३० मार्च पासून होणार आहेत. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी पूर्ण प्रॉक्टर्ड पद्धतीचा वापर केला जाणार आहे. परीक्षेत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच वेळा इशारा दिला जाईल, त्यानंतर परीक्षा आपोआप बंद होणार आहे.

परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी ही परीक्षा महाविद्यालय स्तरावर ऑनलाइन घेतली जाईल अशी चर्चा होती. पण विद्यार्थी आणि महाविद्यालयांची सोय लक्षात घेता परीक्षा वैयक्तिक मोबाईल घ्यावी की परीक्षा केंद्रावर याचा निर्णय घेण्यासाठी उपसमिती नेमली आहे. ही उपसमिती तीन दिवसात याचा अहवाल सादर करेल. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी महाविद्यालयांच्या लॅबचा उपयोग केला जाईल. लवकरच याबाबतचे परिपत्रक काढले जाईल, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले.

अंतिम वर्षाची परीक्षा ७० गुणांची
पदवी व पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्ष सोडून इतर सर्व वर्षाच्या परीक्षा बहुपर्यायी प्रश्‍न (मल्टिपल च्वाइस क्वेश्‍चन-एमसीक्यू) पद्धतीने होणार आहेत. ही परीक्षा ५० गुणांची व एका तासाची होणार आहे. तर अंतिम वर्ष हे महत्त्वाचे असल्याने या वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा ७० गुणांची व दीड तासाची होणार आहे. यामध्ये ५० गुणांचे एमसीक्यू प्रश्‍न असतील, यासाठी एका तासाचा वेळ असेल. तर २० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी अर्ध्या तासाचा वेळ असेल. विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी पाचपैकी ४ प्रश्‍न सोडवावे लागतील. प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर ३० शब्दांच्या आत असणे आवश्‍यक आहे. या प्रश्‍नांचे उत्तर एका कागदावर लिहून त्याचे ते स्कॅन करावे लागणार आहे. त्यानंतर त्याचा क्युआर कोड जनरेट करून तो उत्तरपत्रिकेला जोडावा लागणार आहे.

‘‘अंतिम वर्षाची परीक्षा वेगळ्या पद्धतीने होणार आहे, त्यामुळे त्याचे प्रशिक्षण प्राध्यापकांना दिले जाणार आहे. तर विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेपूर्वी लेखी उत्तर कसे लिहावे, ते स्कॅन कसे करावे, क्युआर कोड कसा करावा, तो अपलोड कसा करावा याचे व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात येतील. त्यामुळे विद्यार्थी, प्राध्यापक यांच्या अडचणी दूर होतील.’’
- डॉ. मनोहर चासकर, अधिष्ठाता, पुणे विद्यापीठ

- प्रथम सत्र परिक्षेसाठी साडे सहा लाख विद्यार्थी
- इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमातून सुमारे ७५०० विषयांची परीक्षा
- आत्तापर्यंत ३ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले, २८ फेब्रुवारी पर्यंत मुदत
- प्रथम वर्ष ते अंतिम पूर्व वर्ष परीक्षा ५० गुणांची आणि एका तासाची
- अंतिम वर्षाची परीक्षा ७० गुणांची आणि दीड तासाचा वेळ
- मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात वेळापत्रक जाहीर होणार

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT