Pune sakal
पुणे

Pune Road Condition: आठ कोटी रुपये खर्चून तयार केला रस्ता, मात्र ३ वर्षातच वाजले बारा, मुख्यमंत्री सडक योजनेचे पैसे पाण्यात ?

Wagholi: एवढ्या जड वाहतुकीने रस्ता उखडला आहे. उखडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune Latest Update: सुमारे आठ कोटी रुपये खर्चून बनविलेला वाघोली - भावडी रोड उखडला आहे. या रस्त्यावरून क्षमतेपेक्षा जास्त जड वाहतूक होते. मुख्यमंत्री सडक योजनेतून या रस्त्याची निर्मिती करण्यात आली होती. रस्ता बनविण्यापूर्वी त्या वरून होणारी वाहतूक व रस्त्याची मजबुती याची सांगड न घातल्याने आठ कोटी रुपये पाण्यात जाणार आहेत.

सुमारे तीन वर्षापूर्वी या रस्त्याची निर्मिती करण्यात आली. या रस्त्यावरून खडी भरलेल्या डंपरची वाहतूक होते. डंपरचालक क्षमतेपेक्षा जास्त खडी भरून वाहतूक करतात. दररोज शेकडो डंपरची वाहतूक या रस्त्यावरून होते. एवढ्या जड वाहतुकीने रस्ता उखडला आहे. उखडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

यामुळे या रस्त्यावरून जाणे कसरतीचे झाले आहे. लोणीकंद येथील खाण वाहतूक सुरभी हॉटेल मार्गे होणे गरजेचे आहे. मात्र ती वाहतूकही याच रोडने होते. यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण वाढत आहे. याचा सर्वाधिक त्रास भावडी गावातील व रोडवरील ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. या रस्त्याची त्वरित डागडुजी करावी अशी नागरिकांची मागणी आहे.

तीनच वर्षात रस्त्याची ही अवस्था झाली आहे. आठ कोटी रुपयांचा हा चुराडा आहे. या रस्त्यावरून क्षमतेपेक्षा अधिक जड वाहतूक होते. वाहतूक कमी करून रस्त्याची त्वरित डागडुजी करणे गरजेचे आहे. हे न झाल्यास भावडी रोड कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.

संजय सातव, रहिवासी, भावडी रोड, वाघेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT