Pune will get enough water But what about the water tax
Pune will get enough water But what about the water tax 
पुणे

पुणेकरांना मिळणार पुरेसे पाणी; पण पाणीपट्टीचे काय?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यातील वाढत्या लोकसंख्येला पुरेल इतके म्हणजे साडेसतरा टीएमसी पाणी देण्याचा महापालिकेचा पाटबंधारे खात्याकडे आग्रह कायम आहे. सध्या जुन्या कराराप्रमाणे साडेअकरा "टीएमसी' पाणी मिळत असले, तरी पुरेशा पाण्यासाठी लढाई सुरूच आहे, असे महापालिका प्रशासनाने गुरुवारी (ता.21) पुन्हा स्पष्ट केले.

जादा पाण्याचा प्रस्ताव पाटबंधारे खात्यामुळेच रेंगाळला असून, जादा पाणीपट्टी आकारण्याचा अधिकार या खात्याला नाही, असे महापालिकेने म्हटले आहे. त्यामुळे पुणेकरांना जुन्या दरानेच पुरेसे पाणी मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

महापालिका आणि पाटबंधारे खात्यातील पाणीसाठ्याचा करार सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर किती पाणीसाठा मागितला आहे, तो किती लोकसंख्येला पुरेल, नवा प्रस्ताव मंजूर का होत नाही, आदी प्रश्‍न उपस्थित करीत सदस्यांनी पाण्याची गरज आणि मागणी जाणून घेतली. त्यावर पाणीपुरवठा खात्याचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी खुलासा केला.

ते म्हणाले, "शहरासाठी साडेअकरा "टीएमसी' पाणी घेण्याचा करार चालू महिन्यात संपला. सहा महिन्यांचा तात्पुरता करारही संपल्याने साडेसतरा "टीमएमसी'चा प्रस्ताव पाठविला आहे. परंतु, पाटबंधारे खात्याने तो राज्य सरकारकडून मंजूर करून घेतला नाही. त्याच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करीत आहोत. त्यामुळे पुणेकरांच्या गरजेइतके पाणी मिळेल. मात्र, करारापेक्षा अधिक पाणी घेतल्यास जादा पाणीपट्टी घेण्याचा अधिकार महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला आहे. सध्या आपण कालव्यातून नव्हे तर धरणातून पाणी घेत असल्याने त्याचा दहा हजार लिटरचा दर 25 पैसे इतका आहे. '' 

थकबाकी नाही 
पाटबंधारे खात्याची कोणतीही थकबाकी महापालिकेकडे नाही. आधी 410 कोटी रुपयांची थकबाकी दाखविणाऱ्या खात्याने हा आकडा अडीचशे कोटी रुपयांपर्यंत कमी केला. त्यानंतर दीडशे कोटी रुपये आणला. त्यातून 120 कोटी रुपये दिले आहेत. आणखी 25 कोटी रुपये देण्याचे नियोजन आहे, असेही कुलकर्णी यांनी सांगितले. 

कालव्याचा मिळकतकर वसूल करणार 
करार संपल्यानंतर पाणी घेतल्यास दुप्पट पाणीपट्टी वसुलीचा इशारा देणाऱ्या पाटबंधारे खात्याला "धडा' शिकविण्याची भूमिका महापालिकेने घेतली आहे. शहरातून वाहणाऱ्या 19 किलोमीटर लांबीच्या कालव्याचा मिळकतकर वसूल करण्यात येणार असून, त्यासाठी या खात्याला पत्र पाठविले आहे. व्यावसायिक दराप्रमाणे कालव्याला मिळकतकर आकारून, त्याची थकबाकीही वसूल करणार आहोत, असेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. अजित पवार, उदयनराजे भोसले यांनी केलं मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Sakal Podcast : मावळ लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? ते सुनीता विल्यम्सची पुन्हा अवकाश भरारी

SCROLL FOR NEXT