Water 
पुणे

डोस्क्यावरल्या हंड्याचा भार हुईल हलका! दलित वस्त्यांमध्ये घरा-घरात नळजोडणी

गजेंद्र बडे

पुणे : गावची पिण्याच्या पाण्याची टाकी आणि आमच्या दलितवस्तीचे अंतर जवळजवळ एक किलोमीटरचे आहे. दलित वस्तीला वेगळी पाणी योजनाच नाही. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही डोस्क्यावर हंडा घेऊन पाणी आणित आहोत. घरात पाण्याचा नळ झाल्यास लई बरं होईल. यामुळं आमच्या डोस्क्यावरील हंड्याचा भार कायमचा कमी होईल, असे दौंड तालुक्यातील पाटस येथील गृहिणी वंदना खारतुडे सांगत होत्या.

जिल्हा परिषदेच्या सामाजिक न्याय विभागाने जिल्ह्यातील दलित वस्त्यांमध्ये घरां-घरात पिण्याच्या पाण्यासाठी नळजोडणी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा दलित वस्त्यांमधील महिलांना फायदा होईल का, या अनुषंगाने खारतुडे बोलत होत्या. ही झाली दलित वस्त्यांमधील गृहिणींची प्रातिनिधिक प्रतिक्रिया, पण दूर अंतरावरून पाणी आणाव्या लागणाऱ्या सर्वच महिलांच्या या भावना आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या निर्णयाचा जिल्ह्यातील सुमारे एक लाख कुटुंबांना लाभ होईल, असा प्राथमिक अंदाज जिल्हा परिषदेच्या सामाजिक न्याय विभागाच्या सभापती सारिका पानसरे यांनी वर्तविली आहे. त्या म्हणाल्या, "जिल्ह्यातील नेमक्या किती कुटुंबांकडे नळ जोडणी उपलब्ध नाही, यांची निश्र्चित आकडेवारी उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व दलित वस्त्यांमधील कुटुंबांचे याबाबत सर्वेक्षण करण्यात येत आहे. येत्या दोन आठवड्यात हे सर्वेक्षण पूर्ण केले जाणार आहे.

या सर्वेक्षणानुसार नळजोडणी नसलेल्या सर्व कुटुंबांना येत्या २०० दिवसांत  नळ जोडणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात एकूण ३ हजार ६८५ दलित वस्त्या आहेत. यामध्ये प्रत्येकी सरासरी ५० कुटुंब वास्तव्यास आहेत. यानुसार एकूण सुमारे १ लाख ८५ हजारांच्या आसपास कुटुंब असतील, अशी शक्यता आहे.

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, आदिवासी विभाग, जलजीवन मिशन, पंधरावा वित्त आयोग आणि सामाजिक न्याय विभागाच्यावतीने संयुक्तपणे   या नवीन उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

जिल्ह्यातील दलित वस्त्यांची सद्य:स्थिती :

- एकूण ग्रामपंचायती - १ हजार ४०७.

- दलित वस्त्यांची संख्या - ३ हजार ६८५.

- दलित वस्त्यांमधील कुटुंबांची संख्या - सुमारे १ लाख ८५ हजार (सर्वेक्षण चालू).

- सध्या नळजोडणी नसलेल्या कुटुंबांची संख्या - सुमारे १ लाख.

जिल्ह्यातील सर्व दलित वस्त्यांमधील नळजोडणी नसलेल्या कुटुंबांचे सर्वेक्षण केले जात आहे. यामध्ये नळजोडणी नसल्याचे आढळून आलेल्या सर्व कुटुंबांना नळजोडणी दिली जाणार आहे. येत्या २० मार्चला एकाचवेळी सर्व नळजोडण्यांचे लोकार्पण करण्याचे नियोजन केले आहे.
- सारिका पानसरे, सभापती, सामाजिक न्याय विभाग, जिल्हा परिषद, पुणे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heart Attack Case : क्रिकेट खेळताना मैदानावरच बारावीत शिकणाऱ्या युवकाला हृदयविकाराचा झटका; उत्कर्षच्या मृत्यूने हळहळ

राम ललाच्या प्राणप्रतिष्ठेचा दुसरा वर्धापन दिन; राजनाथ सिंह यांनी केले ध्वजारोहण, कसा झाला उत्सव?

योगी सरकारचा २०२६ साठी मास्टर प्लॅन, एका वर्षात १ कोटी महिला बनणार 'लखपति दीदी'!

Latest Marathi News Live Update : मनसेचे मुंबईतील उमेदवार राज ठाकरेंच्या भेटीला

Sangamner Crime: बैलांची वाहतूक करणारा कंटेनर ताब्यात; ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त; पोलिसांमुळे पुढील अनर्थ टळला!

SCROLL FOR NEXT