Rojgar-Hami-Yojana 
पुणे

पुणे : ६० हजार मजुरांच्या हाताला मिळणार काम; रोजगार हमीची कामे सुरु होणार!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यातील मजूरांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने रोजगार हमी योजनेची किमान ३ ते कमाल ५ कामे मंजूर करावीत आणि येत्या सोमवारपासून (ता.२०) प्रत्यक्ष कामांना सुरुवात करावी, असा आदेश पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व ग्रामपंचायतींना दिला आहे.

जिल्हा परिषदेच्या या आदेशामुळे जिल्ह्यात किमान सात हजार कामे सुरू होऊ शकणार आहेत. शिवाय या कामामुळे  ६० हजार मजुरांना रोजगार उपलब्ध होऊ शकणार असल्याचे आयुष प्रसाद यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्याचा चालू आर्थिक वर्षाचा (२०२०-२१) एकूण १०६ कोटी रुपयांचा रोजगार हमी योजनेच्या कामांचा वार्षिक आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या आराखड्याला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरीही दिलेली आहे. या आराखड्यात सुमारे २५ हजार कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. यापैकी निम्मी म्हणजेच सुमारे साडेबारा हजार कामे ग्रामपंचायती तर, तेवढीच कामे अन्य सर्व सरकारी यंत्रणामार्फत करावयाची आहेत.

दरम्यान, सध्या लॉकडाउन सुरु असल्याने केवळ गावातील मजुरांनाच नव्हे तर, काम मागेल त्याला हे काम उपलब्ध करून द्यावे. यामध्ये परराज्यातील मजुरांनाही समाविष्ट करून घ्यावे, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात एकूण एक हजार ४०७ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींमार्फत गावपातळीवरील रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावी लागतात. यानुसार पहिल्या टप्प्यात गरजेनुसार तीन ते पाच कामे सुरू करणे अनिवार्य केले आहे.                

जिल्ह्यात गेल्या वर्षी स्वतःला लाख मजुरांची नोंदणी झाली होती. त्यापैकी प्रत्यक्षात ६१ हजार मजुरांनीच  रोजगार हमीच्या कामांचा लाभ घेतला होता. दरम्यान, सध्या सर्वच क्षेत्रातील कामे बंद असल्याने आणि मागेल त्या प्रत्येकालाच रोजगार उपलब्ध करून दिला जाणार असल्याने मजुरांची संख्या वाढेल, अशी अपेक्षाही आयुष प्रसाद यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

Toll Tax Rule Change : सरकारने बदलला टोल नियम!, आता अपूर्ण ‘एक्सप्रेस-वे’वर नाही होणार वसूली

Pune News : आयफोन विमा दावा नाकारल्याप्रकरणी ग्राहक आयोगाचा मोठा निर्णय; ८९ हजार परत करण्याचे आदेश

IND vs NAM : ७ षटकांत १०४ धावा चोपणारा भारत २०९ वर का अडकला? India vs Pakistan लढतीपूर्वी चिंता वाढवणारी गोष्ट

T20 WC IND vs NAM : इशान किशन, हार्दिक पांड्या बरसले, भारताने अनेक विक्रम नोंदवले; शेवटच्या १२ चेंडूंत ५ विकेट्स पडल्या

SCROLL FOR NEXT