corona 
पुणे

आंबेगावात दोन पॉझिटिव्ह, शिरूरला 31 जण निगेटीव्ह, बारामतीत आणखी एक रुग्ण   

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आंबेगाव तालुक्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत दोनची वाढ झाली असून, तालुक्यातील रुग्णांची संख्या 40 झाली आहे. शिरूर तालुक्यातील ३१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने शिरुकरांचा जीव भांड्यात पडला आहे. तर, बारामतीतील कोऱ्हाळे बुद्रुक येथील कोरोनाबाधित ज्येष्ठ नागरिकाच्या पत्नीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

चक्रीवादळाने हिरावला पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा घास
 
घोडेगाव : आंबेगाव तालुक्‍यात काल नारोडी येथील एक व आज पारगाव येथील एक, असे दोन रुग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्‍यात रुग्णांची संख्या 40 झाली आहे. त्यातील पाच पूर्ण बरे झाले आहेत. नारोडीतील 60 वर्षीय रुग्ण मुंबईहून 21 मे रोजी आठ जणांच्या कुटुंबासह आला होता. 31 मे रोजी त्रास सुरू झाल्याने त्यास पुणे येथील रुग्णालयात दाखल केले. त्यांचा काल रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. घरातील 8 व शेजारचे दोन जण, अशा दहा जणांना होम क्‍वारंटाइन केले आहे. पारगाव येथील रुग्ण मुंबईहून 16 मे रोजी आला होता. त्यांचा रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला. नारोडी व पारगाव येथे योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. 

पारगाव : पारगाव (ता. आंबेगाव) येथे मुंबईवरुन आलेला पहिला  ५०  वर्षीय कोरोना  पॉझिटीव्ह रूग्ण सापडल्याने  नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. सदर रुग्ण   मुंबई  (घाटकोपर ) येथून १६ मे रोजी गावाला आला होता. त्यांच्या कुटुंबात तीन व्यक्ती असून सदर व्यक्तीला १८ दिवस विलगीकरण करण्यात आले होते. परंतु २ जून रोजी  त्या व्यक्तीला त्रास होवू लागल्याने पुणे येथील वाय.सी.एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आज दुपारी या रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली. प्रशासनाने रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याबरोबर पारगाव सिल बंद केले आहे. पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे, बिटजमादार सागर गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे आदिंनी संबंधित गावांना भेट देऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. या वेळी सरपंच बबनराव ढोबळे, ग्रामविकास अधिकारी के. डी. भोजणे हजर होते.

शिरूर : शिरूर येथील प्रितम प्रकाश नगर व महादेव नगर या गजबजलेल्या उपनगरांबरोबरच; अण्णापूर येथील कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेले १२ जण; तसेच या बाधितांवर उपचार झालेल्या रुग्णालय, खासगी लॅब व ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी, अशा ३१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने शिरुकरांचा जीव भांड्यात पडला आहे. शिवाय तालुक्‍यातील ३१ पैकी निम्मे कोरोनाबाधित ठणठणीत झाल्याने तालुक्‍यालाही दिलासा मिळाला आहे. २९ मे रोजी शेवटचा रुग्ण सापडला होता. त्यानंतर गेल्या पाच दिवसांत नवीन रुग्ण आढळला नसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे यांनी सांगितले. 

मांडवगण फराटा : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 17 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डा. मंजुषा सातपुते-इसवे यांनी दिली आहे. आज सायंकाळी मिळालेल्या अहवालानुसार रुग्णाच्या कुटुंबातील नऊजणांसह इतर आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत . सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने मांडवगण फराटा गावाला व शिरूर तालुक्‍यातील पूर्व भागतील गावांना दिलासा मिळाला आहे. या रुग्णांचा तपासणी अहवाल तपासणीसाठी पाठवल्यापासून गावातील नागरिकांमध्ये भीती होती. या 17 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. परंतु अहवाल येणे बाकी होते. सर्वांचे अहवाल आज निगेटिव आले आहेत. यामुळे ग्रामस्थांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु अहवाल निगेटिव्ह आले असले तरी नागरिकांनी बेफिकीर राहू नये. गावात चौकात काम नसताना फिरू नये, असे आवाहन केले आहे. 

वडगाव निंबाळकर : बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथील कोरोनाबाधित ज्येष्ठ नागरिकाच्या पत्नीचाही अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दोन दिवसांपूर्वी एका 90 वर्षीय ज्येष्ठाला कोरोनाची बाधा झाली होती. पत्नीला तपासणी केली असता तीलाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोऱ्हाळेकरांची चिंता वाढली आहे. कोरोनाबाधिताच्या संपर्कातील 12 जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 11 जणांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला. आणखी काही जणांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT