Quantum dots now look at the movement of cells 
पुणे

शरिरातील पेशींच्या हालचालींवर ठेवता येणार लक्ष; पुण्यात झालं संशोधन

अक्षता पवार

पुणे : पेशींमधील होणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच पेशींमधील घटकांची रासायनिक घटना पूर्ण झाली आहे की नाही हे समजण्यासाठी पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेच्या (एआरआय) वतीने क्वांटम डॉट्सची नवीन प्रक्रिया विकसित केली आहे. नॅनोपार्टीकल्सच्या प्रणालीचा वापर करत या आधुनिक प्रक्रियेची निर्मिती करणे शक्य झाले आहे. यामुळे आता पेशींच्या विशिष्ट कार्य घटकांमध्ये होणाऱ्या रासायनिक क्रिया किंवा बदल पाहणे आणखीन सोपे झाले आहेत. तसेच याचा वापरातून पेशींच्या रचनेत झालेल्या बिघाड व बदलांचा अभ्यास केला जाऊ शकतो. जैववैद्यकीय क्षेत्रासाठी महत्वाचे असून कर्करोग किंवा इतर पेशींचा आजारांना ओळखण्यासाठी साहाय्यक प्रक्रिया.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

क्वांटम डोट्सच्या (क्यूडी) संश्लेषणासाठी विकसित करण्यात आलेल्या नवीन प्रक्रिये संदर्भात ‘कोलाइड’ आणि ‘इंटरफेस सायन्स’ या आधुनिक विज्ञानविषयक नियतकालिकांमध्ये माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. त्यानुसार या प्रक्रियेमध्ये निरंतर प्रवाह आणि सक्रिय मायक्रोरिऍक्टरची मदत घेतली जाते. या प्रक्रियेमुळे प्रकाशकिरणे विद्युतचुंबकीय वर्णपटाला पार करून त्याचे तरंग दृष्यमान होवू शकतात.

पुण्यातल्या `त्या` भीती वाटणाऱ्या जागा अन् कीर्ररररर....शांतता!

सामान्यतः पेशींमधल्या घटकांची दृष्यमानता, पेशींचे कार्यप्रक्रियेचा माग काढणे आदि गोष्टींसाठी जैवप्रतिमा निर्माण करुन पारंपरिक पद्धतीनुसार 'फ्लुरोफोरस'चा वापर केला जातो. यासाठी फ्लूरोसन्ट रसायन संयुगांचा वापर केला जातो. परंतु ही पद्धत फोटाब्लिचिंगसाठी असुरक्षित आहे. त्यामुळे क्वांटम डॉट्स प्रक्रिया फ्लुरोफोरस पद्धतीपेक्षा जास्त लाभदायक असल्याचे संशोधकांचे मत आहे. मात्र क्यूडीमुळे संश्लेषणाच्यावेळी पुनरूत्पादनक्षमतेसाठी आवश्यक गुणधर्म मिळवणे हे आव्हानात्मक कार्य ठरते. दरम्यान या आव्हानावर मात करण्यासाठी एआरआईचे 'नॅनोबायोसायन्स ग्रुप'चे संशोधक डॉ. धनंजय बोडस यांनी या नवीन प्रक्रियेला विकसित केले.

अरे बापरे ! मार्केट यार्डात पुणेकरांची झुंबड; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा       

"संश्लेषण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवून पुनरुत्पादकता प्राप्त करता येवू शकते. मायक्रोरिऍक्शन तंत्रज्ञान हा केवळ पर्यायच नाही तर त्याचे अनेक फायदे आहेत. या तंत्रज्ञानाला थर्मल ग्रॅडिएंटस व अभिकर्मकांचा वापर कमी केला जातो. या पद्धतीचे ऑटोमेशन केल्यास ती उद्योगांसाठी व्यवहार्य ठरू शकणार आहे. भविष्यात यादृष्टीने नियोजन करणे शक्य आहे. पारंपरिक फ्लुरोफोरसला चांगला आणि कमी खर्चिक तसेच कार्यक्षम पर्याय या संशोधनामुळे उपलब्ध होवू शकतो."
- डॉ. धनंजय बोडस, वैज्ञानिक - आघारकर संशोधन संस्था

बारामती तालुक्‍यात कोरोनाची मुंबई मार्गे पुन्हा एन्ट्री...  

क्यूडी प्रक्रियेची निर्मिती आणि प्रत्येकशिक वापर

या प्रक्रियेत संश्लेषित क्यूडीला सिलिकॉन कोटिंगच्या मदतीने जैवअनुरूप बनवण्यात आले. यामुळे क्वांटम कार्यक्षमता वाढली असून फोटोस्टॅबिलिटीमध्ये सुधारणा झाली. पॉलिमरचे लेपन केलेले क्वांटम फ्लोरोसंट 'नॅनोक्रिस्टल मल्टीस्पेक्ट्रल बायोइमेजिंग'मध्ये यशस्वी लागू करण्यात आले. यानंतर एकल उत्तेजनाच्या तरंगलांबीवर (वेव्हलेन्थ) झालेल्या बहुउत्सर्जनाचा परिणाम पेशींच्या घटकांमध्ये आणि 'जेब्राफिश' पेशींवर झाल्याचे दिसून आले.

पुण्याच्या सदाशिव पेठेतील 'ते' ३३ रूग्ण बरे; संपर्कात आलेल्यांना शोधणे ठरतेय अवघड
पारंपरिक फ्लुरोफोरस पद्धतीचे आव्हाने

- 'ओव्हरलॅपिंग स्पेक्ट्रा'मुळे याच्या वापरावर मर्यादा 
- विशेषतः मल्टीस्पेक्ट्रल जैवप्रतिमा विकसित करताना प्रतिबंध 
- फ्लुरोफोरस पद्धतीने फोटाब्लिचिंग करणे असुरक्षित 
- पेशींच्या पृष्ठभागावर येणारा विषाक्त थर कमी करणे आव्हानात्मक

क्वांटम डॉट्सच्या नवीन प्रक्रियेचे वैशिष्ट्य

- पेशींमधील विशिष्ट प्रक्रियेला पाहण्यासाठी पारंपरिक पद्धतीचा वापर कमी
- क्वांटम डॉट्स पारंपारिक 'फ्लुरोफोरस'मध्ये उद्भवणाऱ्या समस्यांवर मात करतात
- मल्टीस्पेक्ट्रल जैवप्रतिमा घेताना पेशींमधले वेगवेगळे कार्यघटकांना लक्ष्य बनवून संयोग घडवून आणण्याची शक्यता वाढते
- वैद्यकीय क्षेत्रासाठी महत्वाचे 
- या प्रक्रियेमुळे कमी किंमतीत 'मोनोडिस्पर्स्ड', क्वांटम कार्यक्षम, 'फोटोस्टेबल' आणि जैवअनुरूप (बायोकम्पॅटीबल) क्वांटम डॉट्सचे उत्पादन शक्य


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT