khanapur quarntine center.jpg
khanapur quarntine center.jpg 
पुणे

पश्चिम हवेलीकरांसाठी 'या' भागात असणार नवे क्वारंटाइन सेंटर​

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला (पुणे) : खानापूर गावातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या गेल्या पाच सहा दिवसात झपाट्याने वाढली. आज अखेर 34 रुग्ण आहेत. म्हणून आमदार भीमराव तापकीर व प्रांताधिकारि सचिन बारवकर यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी तातडीने येथील संस्थेची शाळेची इमारत क्वांरनटाइन केंद्र करण्यासाठी घेतली जाणार असल्याचे सांगितले. 


खानापूर, घेरा सिंहगड, डोणजे, गोऱ्हे खुर्द येथे रुग्ण सापडले आहेत. खानापूर आरोग्य केंद्रात पॉझिटिव्ह रुग्ण 35, तर होम क्वांरटाइन 105 रुग्ण आहेत. या भागात रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आमदार भीमराव तापकीर यांनी गावात भेट घेतली. खानापूर येथे तापकीर यांच्या समवेत हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, अतिरिक्त पोलिस अधिकारी विजय पाटील, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात, सरपंच निलेश जावळकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील उपस्थित होते. त्यांच्या बरोबर, शिवसेनेचे विधानसभा प्रमुख नितीन वाघ, माजी सरपंच नारायण जावळकर, नामदेव जावळकर, मुरलीधर जावळकर, रवींद्र जावळकर, संजय जावळकर, नंदू जावळकर उपस्थित होते. 

रुग्ण संख्या वाढत असल्याने या परिसरात खानापूर येथे क्वारांटाइन सेंटर सुरू करण्यासाठी तातडीने कार्यवाही करा. असे सरपंच निलेश  जावळकर यांनी मागणी केली होती. त्यानुसार आमदार तापकीर यांनी अधिकाऱ्यासह खानापूर येथील एका संस्थेच्या जागेची पाहणी केली. तातडीने केंद्र उभारण्याबाबत भूमिका घेतली. सगळीकडे रुग्ण संख्या वाढत असल्याने क्वांरटाइन सेंटरची गरज असल्याचे सांगितले.

प्रांताधिकारी बारवकर यांनी ही क्वांरनटाइन केंद्र सुरू करण्यासाठी इमारत ताब्यात घेण्यासंदर्भात आदेश काढणार असल्याचे सांगितले. त्यानुसार, केंद्रासाठी गाद्या खाटा खरेदी करण्यात येईल आणि शाळेचा ताबा घेण्यात येईल. तसेच, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी ही इमारत बांधली. किरकोळ काम राहिले आहे. त्याचे उर्वरित काम पूर्ण करून तातडीने पूर्ण इमारत ताब्यात घ्यावी. आणि तेथे तातडीने अधिकारी कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी देण्यात याव्यात. असे आमदार तापकीर यांनी सांगितले.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT