Raid on call center for fraud with US citizens by threatening drug smuggling 
पुणे

ड्रग्ज् स्मगलिंगच्या भीतीने अमेरिकन नागरिकांना फसविण्याऱ्या कॉल सेंटरवर छापा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ड्रग्ज् स्मगलिंगची भीती दाखवून हजारो अमेरिकन नागरिकांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या दोघांना सायबर पोलिसांनी लष्कर परिसरातून अटक केली. अमेरिकेतून मिळालेल्या माहितीच्या आधारे लष्कर परिसरातील कॉल सेंटरवर बुधवारी रात्री छापा घालून सायबर गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळण्यात आल्या. 

फिल्मीस्टाईलने पाठलाग करत गावठी कट्टा बाळगणाऱ्यास केले अटक

अकीब आल्ताफ शेख (वय 27, कांती निमाई अपार्टमेंट, साईबाबानगर, कोंढवा), सारीम अमान शेख (वय 29, रा. भीमपुरा, बाबाजान चौक, लष्कर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

पिंपरीत भाजपला दणका; महामंडळांवरील तीनही नियुक्‍त्या रद्द

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर परिसरामध्ये एक बनावट कॉल सेंटर चालविले जात असून त्याद्वारे अमेरिकन नागरिकांची फसवणूक केली जात असल्याची गोपनीय माहिती सायबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, सायबर पोलिसांच्या पथकाने लष्कर परिसरातील प्लेस ऑफ वर्कशीप बिल्डींग या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या किंगस्टन मिडीयाच्या कार्यालयावर बुधवारी रात्री छापा घातला. तेथून कॉल सेंटर चालविणाऱ्या अकीब व सारीम शेख यांना ताब्यात घेण्यात आले. 

अकीब, सारीम शेख व त्यांच्या कामगारांकडून अमेरिकेतील सोशल सिक्‍युरीटी अॅडिमनीस्ट्रेशन नावाची बनावट संस्था तयार केली होती. त्यानुसार, अमेरिकेतील नागरिकांशी संपर्क साधून त्यांना आपण अमेरिकेच्या सोशल सिक्‍युरीटी अॅडिमनीस्ट्रेशन विभागातून बोलत असल्याचे सांगितले जात होते.

रशियन वैमानिकांनी पुण्यात उडविले सुखोई 30

काही अमेरिकन नागरिकांकडून त्यांच्या सोशल सिक्‍युरीटी क्रमांकाचा वापर ड्रग्ज स्मगलिंगसाठी केला जात असल्याची बतावणी करून त्यांना भीती दाखविली जात होती. त्यानंतर तडजोड करण्यासाठी अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने संपर्क साधल्याचे भासवून नागरिकांना 200 ते 250 अमेरिकन डॉलरचे वॉलमार्ट, ईबे, टारगेट, बेस्टबाय गिफ्टकार्ड खरेदी करायला लावले जात होते. त्यानंतर संबंधीत कार्डचे पैशात रुपांतर करून अमेरिकन नागरिकांची फसवणूक केली जात होती.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी ► क्लिक करा 
 
पोलिसांनी त्यांच्याकडून तीन मोबाईल, 10 कॉम्प्युटर हार्डडीस्क, तीन राऊटर, 8 हेडफोन, एक पेनड्राईव्ह, स्क्रीनशॉटची 30 पाने असा ऐवज जप्त करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे करीत आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक गंगाधर घावटे, पोलिस कर्मचारी अस्लम आत्तार, अजित कुऱ्हे. योगेश वाव्हळ, संतोष जाधव, प्रसाद पोतदार, प्रविणसींग राजपुत, ज्योती दिवाणे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचं मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: रेल्वेच्या चौथ्या लाईन साठी शेतीच्या अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

SCROLL FOR NEXT