pirangut 
पुणे

मुळशीकरांच्या नशिबी यंदाही रस्त्यांवरील डबक्यांतूनच प्रवास? 

धोंडिबा कुंभार

पिरंगुट (पुणे) : मुळशी तालुक्यातील पुणे- कोलाड रस्त्यावरील साचलेल्या पाण्याची डबकी अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. पावसाळा सुरू झाला तरी या रस्त्यावरील ठिकठिकाणी झालेली डबकी अद्याप बुजविली नसल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण करीत आहेत. या रस्त्यावरील साचून राहिलेल्या पाण्याची डबकी तातडीने बुजवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.   

आधीच 'एक ना धड भाराभर चिंध्या' अशी या रस्त्याच्या कामाची अवस्था आहे. त्यामुळे असून अडचण नसून खोळंबा, या परिस्थितीत येथील वाहतूक अडकली आहे. भूगाव येथील राम नदीवरील पुलावर पावसाचे पाणी कायम साचलेले असते. करंजावणे वस्ती, पेट्रोल पंप आणि मुख्य रस्त्यावरून पावसाचे पाणी थेट पुलावर येऊन साचते. 

भूगाव येथील गावठणालगतचा पूल, माताळवडी फाटा येथील पूल, भूकुम येथील शेल पेट्रोल पंपाजवळील रस्ता आदी ठिकाणी रस्त्यावर पावसाचे पाणी सातत्याने वाहत असते. पुलावर कायम फुटभर पाणी तुंबलेले असते. लवळे फाटा, पिरंगुट कॅम्प, वाईन शॉपसमोरील रस्ता, पोलिस चौकीजवळ असलेला लेंडीचा ओढा, लोढा पेट्रोल पंप शेजारचा रस्ता, घोटावडे फाटा येथील संजीवन हॉस्पिटलसमोरचा रस्ता आदी ठिकाणी पाण्याची मोठी डबकी तयार झाली आहेत.

कासार आंबोली येथील वळणापुढे असलेल्या चढावर कायम पाणी साचल्याने वर्षभर हा रस्ता उखडलेला असतो. शिंदेवाडीतील दुर्वा हाॅटेलसमोरील रस्त्यावरील खड्ड्यात पाणी सतत साचलेले असते. सुतारवाडी येथील गडदावणे फाटा येथील पुलावरही कायम पाणी साचलेले असते. सतत पाणी साचल्यामुळे तेथे डांबरी रस्ता उखडून खड्डे पडले आहेत.

या  खड्ड्यामुळे दुचाकीस्वारांचे वारंवार अपघात होत आहेत. साचलेल्या पाण्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.  

पावसाळ्यापूर्वी चांदणी चौक ते माले या दरम्यानच्या रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवणार आहोत. पाणी साचणाऱ्या ठिकाणी तातडीने तात्पुरत्या गटाराची कामे पूर्ण करीत आहोत. रस्त्यात साचून राहणारे पाणी तुंबणार नाही, याची खबरदारी घेत आहोत.                   - सचिन निफाडे,  अभियंता, रस्ते महामंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT