Rapid antigen test will start from tomorrow in Baramati 
पुणे

बारामतीत उद्यापासून रॅपिड अँटीजेन टेस्ट सुरु होणार..

मिलिंद संगई

बारामतीत उद्यापासून रॅपिड अँटीजेन टेस्ट सुरु होणार..

बारामती : शहरात मंगळवारपासून (ता. 4) रुई येथील कोविड केअर सेंटरमध्ये रॅपिड अँटीजेन टेस्ट सुरु केली जाणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.संजयकुमार तांबे यांनी या बाबत माहिती दिली. 

 पुण्यातील तरुण-तरुणींनी कसा केला 'फ्रेंडशिप डे' साजरा? वाचा सविस्तर

रँपिड अँटीजेन टेस्टमुळे अवघ्या अर्ध्या तासातच रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे किंवा नाही हे समजणार असल्याने यंत्रणेवरचा ताणही आपोआपच कमी होणार आहे. ज्या रुग्णांना लक्षणे आहेत, अशा रुग्णांची रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जाणार आहे. या टेस्टमध्ये अहवाल निगेटीव्ह आला तर पुढील तपासण्या होणार नाहीत, मात्र रिपोर्ट पॉझिटीव्ह आला तर त्याच्यावर लगेचच पुढील उपचार सुरु होणार आहेत. 


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी तीन हजार रॅपिड अँटीजेन टेस्टचे किट उपलब्ध करुन दिले आहेत. अवघ्या अर्ध्या तासात याचा अहवाल येणार असल्याने लोकांना वाट पाहत बसावे लागणार नाही. 


माजी खासदार संजय काकडेंनी मेव्हण्याला दिली गोळ्या घालण्याची धमकी​

वैद्यकीय व्यावसायिकांना जे रुग्ण लक्षणे असलेले आहेत असे वाटते आहे, अशा रुग्णांच्या रॅपिड अँटीजन टेस्ट मंगळवारपासून सुरु केल्या जाणार आहेत. ज्या रुग्णांना लक्षणे आहेत, मात्र रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये तो रुग्ण निगेटीव्ह आला आहे त्याची आरटीपीसीआर (रिझर्व्ह ट्रान्सक्रिप्शन पॉलिमर्स चेन रिअँक्शन टेस्ट) चाचणी केली जाणार आहे. मात्र, ज्याच्यामध्ये लक्षणे नाही व रॅपिड अँटीजन टेस्ट देखील निगेटीव्ह आली आहे, अशा रुग्णांची आरटीपीसीआर टेस्ट होणार नाही. 


रुई येथे उद्यापासून लक्षणे असलेल्या व लक्षणे नसलेल्या रुग्णांची स्वतंत्र रांग करुनच स्वॅब घेतले जाणार आहेत. या मुळे लक्षणे नसलेल्या लोकांना रिपोर्ट येण्यासाठी आठ दहा तास वाट पाहत बसावे लागणार नाही. बारामतीच्या दृष्टीने ही महत्वाची सुविधा असून यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेवरचा ताणही आपोआपच कमी होईल. 

Breaking : ससून रुग्णालयात 'इतके' ऑक्‍सिजन बेडस्‌ उपलब्ध होणार; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती​

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fed Rate Hike: अमेरिकेने व्याजदर वाढवले; तुमच्या कर्जाच्या EMI पासून शेअर बाजार ते सोन्याच्या भावापर्यंत काय बदलणार?

Amazon ने भारतात लाँच केले AI-powered 'Alexa+!' हिंदी आणि हिंग्लिश सपोर्टसह सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध...

Latest Marathi News Update : पुण्यात एफडीएची मोठी कारवाई!५६ लाखांचा अन्नसाठी जप्त

FDA: अकरा रुपयांचे सलाईन ३२५ रुपयांना, दर नियंत्रणासाठी ‘एफडीए’चे ‘एनपीपीए’ला पत्र

Provident Fund Latest Update : EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी! PFची पगार मर्यादा २५ हजार; विमा १०.५० लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT