पुणे

हॉटेलमध्ये असणार आता स्पर्शविरहीत सेवा; कशी ते वाचा

सकाळवृत्तसेवा

पुणे - येत्या सोमवारपासून राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र हॉटेलात जेवणासाठी गेल्यानंतर मास्क कसा वापरायचा? तेथे गेल्यानंतर कोरोनापासून बचाव होण्यासाठी हॉटेल चालक कोणती व कशी खबरदारी घेणार, असे अनेक प्रश्‍न नागरिकांना पडले आहेत. याबाबत पुणे रेस्टॉरंट ॲण्ड हॉटेलिअर्स असोसिएशनने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मास्क कसा वापरायचा?
हॉटेलमध्ये जेवायला सुरवात करीत नाहीत, तोपर्यंत मास्क तोंडाला लावणे बंधनकारक आहे. वेटींगला थांबल्यानंतर, खाद्यपदार्थ टेबलावर येईपर्यंत आणि जेवण झाल्यानंतर लगेच मास्क वापरावा लागणार. ग्राहक मास्क वापरतोय की नाही यावर हॉटेल प्रशासनाकडून लक्ष ठेवले जाईल. जेवणापूर्वी व नंतर मास्क वापरण्याची विनंती त्यांना केली जाईल.

टेबलमध्ये सामाजिक अंतर
पन्नास टक्के क्षमतेने कामकाज सुरू करण्यास परवानगी असल्याने टेबलांची संख्यादेखील कमी करण्यात येणार आहे. दोन टेबलांत सामाजिक अंतर असेल, याची खबरदारी घेतली जाईल. तसेच टेबलचा वापर झाल्यानंतर ते प्रत्येकवेळी सॅनिटाईझ केले जाईल. तसेच हॉटेलात ठराविक अंतराने साफसफाई केली जाईल.

ताट, मेन्यू कार्ड कसे असणार?
हॉटेलातील ताट धुवून पुन्हा वापरण्यात येतात. त्याची चांगली स्वच्छता केली नाही तर कोरोना पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे एकदाच वापरायचे पर्यावरणपूरक ताट, वाटी व ग्लास वापरण्यात येणार आहे. मेन्यूकार्डदेखील एका साध्या पेपरवर असेल. ग्राहकांनी त्याआधारे ऑर्डर केल्यानंतर त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जाईल. 

कर्मचारी काय काळजी घेणार? 
ग्राहकांना सेवा पुरविण्यात हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची जबाबदारी महत्त्वाची असते. त्यांनी सतत मास्क व ग्लोज वापरणे बंधनकारक आहे. खाद्यपदार्थ वाढत असताना शक्‍य तेवढे अंतर व कमीत कमी वेळा त्याचा टेबलावरील पदार्थांना स्पर्श होईल, याची काळजी घेतली जाणार आहे. 

स्पर्शविरहीत सेवेवर भर 
खाद्यपदार्थांची ऑर्डर, पैसे देणे अशी कामे स्पर्श विरहित करण्यावर भर द्यावा, अशा सूचना राज्य सरकारने यापूर्वीच काढलेल्या नियमावलीत केल्या आहेत. पार्किंगची सुविधा असलेल्या हॉटेलचालकांनी वाहनांचेदेखील सॅनिटायझेशन करावे, असे देखील त्यात नमूद होते.

काय खबरदारी घेतली जाणार? 
ग्राहकांना हॉटेलच्या गेटवरच सॅनिटाईज केले जाईल. तसेच तापमान तपासले जाणार आहे. ग्राहकांचा टेबल व बेसीन वगळता इतर कोणत्याही ठिकाणी स्पर्श होणार नाही, याचे व्यवस्थापन हॉटेल चालकांकडून केले जाईल. त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर असणार आहे. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT