Documentation started in five districts of the state
Documentation started in five districts of the state 
पुणे

राज्यातील पाच जिल्ह्यात दस्तनोंदणी सुरु; पहिल्याच दिवसात नोंदविले २४ दस्त

सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्यातील सहा जिल्हयात मंगळवारपासून दस्तनोंदणीला सुरूवात झाली. आज पहिल्याच दिवशी राज्यात 24 दस्त नोंदणी होऊन त्यातून राज्य सरकारला पाच लाखाहून रूपयांचा महसूल मिळाला. टप्प्याटप्प्याने राज्यातील अन्य भागातही दस्तनोंदणी सुरू करण्यात येणार आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोना विषाणूचा संसर्ग ज्या भागात नियंत्रित आहे, असा भाग निश्‍चित करून जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन त्या भागात दस्तनोंदणी कार्यालय सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. राज्य सरकारचे आदेश विचारात घेऊन नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने कार्यालय सुरू करताना त्या ठिकाणी काय काळजी घ्यावी, कोणत्या प्रकाराच्या दस्त नोंदणी सुरू ठेवावी, याबाबतच्या उपयोजना व सूचना सर्व जिल्हा उपनिबंकांना देण्यात आल्या होत्या.

गुड न्यूज! भारतात कोरोनाची पहिली चाचणी यशस्वी...

त्यानुसार कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे,पिंपरी-चिंचवड आणि मुंबई वगळता आज पहिल्या टप्प्यात बुलढाणा, नागपूर ग्रामीण, वर्धा, वाशिम, उस्मानबाद, सांगलीचा रेड झोन वगळून या भागातील दस्त नोंदणी कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन आजपासून सुरू करण्यात आली. आज दिवसभरात या दस्तनोंदणी कार्यालयात 14 दस्तांची नोंदणी झाली. त्यातून मुद्रांक शुल्कापोटी राज्य सरकारला पाच लाख रूपयांचा महसूल मिळाला. येत्या दोन दिवसात ग्रीन झोन मध्ये असलेल्या शहरांमध्ये आणखी काही कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन सुरू करण्यात येतील, असे नोंदणी महानिरीक्षक ओमप्रकाश देशमुख यांनी सांगितले.

एका वृत्त वाहिनीच्या 25 कर्मचाऱयांना कोरोना अन्...

मात्र मृत्युपत्र, वाटणीपत्र, हक्कसोडपत्र, बक्षीसपत्र, चुकदुरूस्तीपत्र अशा प्रकाराच्या नवीन दस्तांची नोंदणी वीस जूनपर्यंत नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून थांबविण्यात आली आहे. मात्र अशा दस्तांपैकी ज्यांची मुदत संपणार आहे, अशांची नोंदणी सुरू ठेवण्यात येणार आली आहे. तर भाडेकाराराची नोंदणी जुलैपर्यंत थांबविण्यात आली असून त्यांना ई- रजिस्ट्रेशनचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

धक्कादायक : पुण्यात पुन्हा पोलिसांना कोरोनाचा संसर्ग; पोलिस आयुक्त काय म्हणाले?

कोरोना बाधित रूग्णांची संख्या अत्यल्प आहे. अशा भागात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगी विचारात घेऊन आणि पुरेशी काळजी घेऊन दस्तनोंदणी कार्यालय सुरू करण्यात आली आहे.
- ओमप्रकाश देशमुख ( नोंदणी महानिरीक्षक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Latest Marathi News Live Update : कर्नाटकात दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

SCROLL FOR NEXT