SPPU-Researchers 
पुणे

लॉकडाऊनला 'हा' आहे पर्याय; 'माँन्टे-कार्लो'पद्धतीनुसार संशोधकांचा दावा!

सकाळवृत्तसेवा

पुणे : तुरळक लोकसंख्या असलेल्या ठिकाणी 'लॉकडाऊन'पेक्षा सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) हा प्रभावी पर्याय ठरू शकतो, असा निष्कर्ष आता शोधनिबंधातून पुढे येत आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (आयआयटी) डॉ. मोसेस कार्ता आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. हबिब पठाण यांनी "माँन्टे-कार्लो' पद्धतीच्या वापरातून हे संशोधन केले आहे. गर्दीच्या परिसरात म्हणजे शहरांमध्ये लॉकडाऊन आवश्‍यक असल्याचेही शोधनिबंधात स्पष्ट करण्यात आले आहे. 

संबंधित शोधनिबंध "एसएसआरएन' या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी "लॉकडाऊन' प्रभावी ठरत आहे, परंतु आर्थिक आणि सामाजिक गोष्टींवर त्याचे मोठे दुष्परिणाम दिसत आहे. अशा पार्श्‍वभूमीवर वैज्ञानिक तथ्यांच्या आधारे उपाययोजनांमध्ये योग्य ते बदल करण्याची आवश्‍यकता आहे.

डॉ. पठाण म्हणाले, "अगदी सुरवातीच्या निरीक्षणांवर आधारित हे संशोधन निश्‍चितच दिशादर्शक आहे. तुरळक लोकसंख्येमध्ये लोकांनी सामाजिक अंतरासह इतर आवश्‍यक नियमांचे पालन केले तर तेथे लॉकडाऊन सौम्य करता येईल. रुग्ण बरा होण्याचा कालावधी कमी असेलल्या ठिकाणी संसर्ग जवळ जवळ शून्य होतो असे सिद्ध झाले आहे. ''गर्दीच्या ठिकाणी म्हणजेच शहरांमध्ये सामाजिक अंतर राखणे शक्‍य होत नाही. तसेच तिथे संसर्गाची शक्‍यता सर्वात जास्त असल्यामुळे तिथे लॉकडाऊन आवश्‍यक सांगितला आहे. 

- Coronavirus : पीएम केअरला केलेली मदतच सीएसआरमध्ये; सीएम केअरचा समावेश नाही

असे झाले संशोधन? 
- बाधित परिसराचे वर्तुळाकार एकक निश्‍चित करण्यात आले 
- रूग्ण बरा होण्याचा (रिकव्हरी टाइम) कालावधी 3, 7 आणि 14 दिवस गृहीत धरण्यात आला 
- जगभरातील कोरोना संसर्गाच्या पद्धतीचा अभ्यास करण्यात आला 
- तुरळक आणि जास्त लोकसंख्येसाठी मॉन्टो कार्लो पद्धतीचा अवलंब 

संशोधनातील निष्कर्ष 
- तुरळक लोकसंख्येत संसर्गाचे प्रमाण कमी तर, गर्दीच्या ठिकाणी जास्त 
- ग्रामीण भागात सामाजिक अंतर पाळल्यास लॉकडाऊन सौम्य करता येईल, मात्र शहरांमध्ये लॉकडाऊन आवश्‍यक 
- एकदा कोरोनातून बरा झालेला रुग्ण पुन्हा बाधीत होण्याची शक्‍यता आहे. म्हणून शहरांमध्ये (गर्दीच्या ठिकाणी) बाधित रुग्ण बरे होण्याचा वेळ हा लॉकडाऊनवर अवलंबून नाही 
- सामाजिक एकत्रिकरणावर काटेकोर निर्बंध असावेत 
- सामाजिक अंतर हीच कोरोना विरुद्धच्या लढाईचा गुरुमंत्र आहे.

- Coronavirus : २४ तासांत ९०९ नव्या केसेस; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव म्हणाले...!

संशोधनाचे फायदे 
- संसर्ग नसलेल्या ग्रामीण भागात सामाजिक अंतर पाळत लॉकडाऊन हटवता येईल 
- काही भागातील उद्योग, व्यवसाय, शेतीशी निगडित व्यवस्था पूर्ववत करता येतील 
- जास्त लोकसंख्येच्या ठिकाणी पुढील उपाययोजनांसाठी संशोधनाच्या निष्कर्षांचा उपयोग होईल 

संशोधनाच्या मर्यादा 
- अगदी सुरवातीची आकडेवारी आणि आदर्श नियमपालनांच्या आधारीत संशोधन 
- वय, लिंगानुसार रिकव्हरी टाईम बदलतो त्याचा अंतर्भाव संशोधनात नाही 

- Fight with Corona : ब्रिटीश पंतप्रधानांनी कोरोनाला हरविले; हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज!

"ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगवेगळ्या निकषांच्या आधारे निर्णय घेण्यात यावे. देशाची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती बघता आपल्याला अजून प्रगल्भ नियमांचा अवलंब करावा लागेल. कोरोनाच्या प्रसारासंबंधी झालेले संशोधन निश्‍चितच सरकारला पुढील उपाययोजनांसाठी मदत करेल.'' 
- डॉ. मोसेस कार्ता, भारतीय तंत्रज्ञान संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT