One hundred crore from sale of liquor in Pune district.jpg 
पुणे

दारु विक्रीतून राज्याला मिळाला तब्बल ७७६ कोटींचा महसूल; सर्वाधिक महसूल 'या' जिल्ह्यातून!

अनिल सावळे

पुणे : कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमध्ये  गेल्या महिनाभरात दारु विक्रीतून राज्याला 776 कोटींचा महसूल मिळाला आहे. त्यात सुमारे शंभर कोटी रुपयांचा महसूल केवळ पुणे जिल्ह्यातून प्राप्त झाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी राज्य सरकारने मार्च-एप्रिल महिन्यात दारु विक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले. परंतु पुन्हा चार मेपासून दारु विक्री सुरू करण्यात आली. त्यानंतर गेल्या महिनाभरात वाईन शॉप, देशी दारू दुकान आणि बिअर शॉपींमधून झालेल्या दारु विक्रीतून 776 कोटींचा महसूल राज्याला मिळाला आहे. परंतु दर महिन्याच्या महसुलाच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. पुणे जिल्ह्यातून सुमारे 100 कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे.

पावसामुळे कोरोना धुऊन जातोची ‘व्हायरल’ चर्चा; तज्ञ काय सांगतात?

राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यात दारु विक्रीच्या होम डिलिव्हरीला प्रारंभ केला. राज्यातील सुमारे सात लाख ग्राहकांनी याचा लाभ घेत घरपोच दारु खरेदी केली.
तसेच, राज्यात प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी परमिट रूम, बियर बार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. परंतु या परमिट रूम आणि बियर बारमध्ये ग्राहकांना अन्न उपलब्ध करून देता येणार नाही किंवा याठिकाणी बसता येणार नाही. 

चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी असा बसलाय तडाखा

राज्यातील दारु विक्री दुकाने (कंसात पुणे जिल्ह्यातील संख्या) : 
वाईन शॉप संख्या 1365 (222).
देशी दारू दुकाने 2820 (215).
बिअर शॉपी 3359  (440).
परमिट रूम, बियर बार 5974 (462)


Video : पुणे : मुसळधार पावसाचा नगर रोडच्या रहिवाशांना फटका...घरात शिरले पाणी

''राज्य उत्पादन शुल्क विभागाला दर महिन्याला सुमारे 2100 कोटींचा महसूल मिळतो. या तुलनेत मे महिन्यातील महसूल कमी आहे. मे महिन्यात दारु विक्रीतून 776 कोटी आणि लायसन्स शुल्कमधून 213 कोटींचा अतिरिक्त महसूल प्राप्त झाला आहे.''
- कांतीलाल उमाप, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क

दारु खरेदीसाठी होम डिलिव्हरी ग्राहक (मे महिना) : 
राज्यात 6 लाख 69 हजार 763 
मुंबई महापालिका, उपनगर क्षेत्रात 
2 लाख 46 हजार 366

वाईन शॉपसमोरील रांगा गायब : 
दारु विक्री सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस दुकानांसमोर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. इतकेच नव्हे तर टोकन पद्धतही सुरू केली होती. मात्र, गेल्या काही दिवसांत अनेक मजूर मूळ गावी परतले आहेत. तसेच, सध्या बहुतांश उद्योग-व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे नागरिकांच्या उत्पन्नातही घट झाली आहे. तसेच, गेल्या महिनाभरापासून दारु विक्री सुरू आहे. त्यामुळे सध्या  वाईन शॉपसमोरील गर्दी ओसरल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT