narayngaon road 
पुणे

अमोल कोल्हे यांचा एकच फोन, कामाला लगेच सुरवात 

रवींद्र पाटे

नारायणगाव (पुणे) : सार्वजनिक बांधकाम विभागाने जुन्नर तालुक्यातील ओतूर- ओझर- नारायणगाव रस्त्यावरील हिवरे खुर्द व कारखाना फाटा येथील रस्त्याचे खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. 

या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत नागरिकांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर त्यांनी कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांच्याशी संपर्क साधून रस्ता दुरुस्त करण्याची सूचना केली होती. त्यानुसार आज सकाळपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.

याबाबत खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले की, नारायणगाव- ओतूर रस्त्यावरील हिवरे खुर्द, कारखाना फाटा या रस्त्याचे काम वन विभागाशी संबंधित असल्याने किलोमीटर ६१.२०० ते किलोमीटर ८१.७०० दरम्यानचे काम प्रलंबित आहे. तर, शेतकऱ्यांनी आक्षेप घेतल्याने किलोमीटर ७६.१०० ते किलोमीटर ६८.३०० दरम्यानच्या रस्त्याचे काम होऊ शकलेले नाही. रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिक व प्रवाशी यांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रस्तावांवर निर्णय होईपर्यंत वेळ लागणार आहे. नागरिकांना वाहने चालवताना होणारा त्रास व खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन तूर्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी तातडीने खड्डे भरुन रस्ता दुरुस्त करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला केली होती. या संदर्भात आपण लवकरच वनविभाग व शेतकऱ्यांशी चर्चा करुन प्रलंबित राहिलेले रस्त्याचे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT