Gold-Seized 
पुणे

पुणे : औषधाच्या कॅप्सूलमधून तिने आणले वीस लाख किंमतीचे सोने!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दुबईहून विमानाने पुण्यात आलेल्या एका महिला प्रवाशाकडून तब्बल 642 ग्रॅम वजनाचे व तब्बल वीस लाख रुपये किंमतीची सोने केंद्रीय सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले. संबंधीत महिला भुकटीच्या स्वरुपात सोन्याची तस्करी करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. ही कारवाई रविवारी पहाटे चार वाजता करण्यात आली. 

मरिअम मोहम्मद सलीम शेख (रा. मुंबई) असे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याविरुद्ध भारतीय सीमाशुल्क कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. रविवारी पहाटे चार वाजता लोहगाव विमानतळावर स्पाईसजेट कंपनीचे दुबईहून आलेले विमान उतरले.

या विमानामध्ये एका महिला प्रवाशाकडे तस्करी केलेले सोने असल्याची खबर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार, दुबईहून आलेल्या विमानातून उतरुन एक महिला प्रवासी गडबडीत विमानतळाबाहेर पडण्याच्या प्रयत्नात असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी महिलेस थांबवून तिच्याकडे विचारणा केली. तेव्हा तिने मरीअम शेख असे नाव सांगून ती मुळची मुंबईची असल्याची माहिती अधिकाऱ्यांना दिली.

अधिकाऱ्यांनी तिच्याकडील साहित्याची तपासणी केली. तेव्हा तिच्याकडे काही औषधी गोळ्या (कॅप्सुल) आढळून आल्या. या गोळ्यांची वैद्यकीय पथकाने तपासणी केली. त्यावेळी संबंधीत गोळ्यांमध्ये सोन्याची भुकटी लपविल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार, अधिकाऱ्यांनी वीस लाख रुपये किंमतीची 642 ग्रॅम वजनाची सोन्याची भुकटी जप्त केली.

ही कारवाई सीमाशुल्क विभागाच्या सहआयुक्त वैशाली पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली. संबंधीत महिला तस्करीचे सोने कोणाला देणार होती, यादृष्टीने तिच्याकडे तपास केला जात असल्याचे पतंगे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, RR vs CSK: राजस्थानच्या तिखट माऱ्यापुढे चेन्नईचे फलंदाज हतबल; पण ओव्हर्टनच्या खेळीनं १२० धावा पार

Aadul Rain : आडूळ परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान

Ambad lightning : अंबड शहरासह परिसरात वादळ, वाऱ्यासह गारा; वीज पडुन दोन युवकांचा मृत्यू

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला गारपिटीचा ऑरेंज अलर्ट; तर उर्वरित राज्याला वादळी पावसाचा इशारा

बिहारमध्ये सत्तेचा मोठा ट्विस्ट! नितीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर नवे मुख्यमंत्री कोण? ४ दिग्गज नेते रेसमध्ये; कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT