RTO offices in Pune will start functioning from Monday 
पुणे

चांगली बातमी! पुण्यात आरटीओ कार्यालयांचे कामकाज सोमवारपासून सुरू होणार

सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्य सरकारने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील प्रादेशिक व परिवहन कार्यालयांचे कामकाज सोमवारपासून करण्यास परवानगी दिली आहे.  या कार्यालयांमध्ये वाहनांच्या नोंदणीचे काम उद्यापासून सुरू होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

25 मार्चपासून राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालय बंद ठेवण्यात आली होती. कोरोनाच्या लॉक डाउनमुळे हा निर्णय घेण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव अजेय मेहता यांनी 17 मे रोजी आदेश काढून सोमवारपासून आरटीओ कार्यालय सुरू करण्याचे आदेश संबंधित कार्यालयांना दिले आहेत. त्यानुसार पुण्यातील आरटीओ कार्यालयाचे कामकाज सोमवारपासून सुरू होणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली. सोमवारपासून नव्या वाहनांच्या नोंदणीचे काम सुरू होणार आहे. त्यांना नंबरही दिला जाणार आहे.

आणखी वाचा - बारामतीकरांचे सोने खरेदीचे आकडे वाचून थक्क व्हाल

आरटीओ कार्यालयांमधील अन्य कामे टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. त्याचा आराखडा लवकरच जाहीर करण्यात येईल, असे शिंदे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. वाहन परवाना देणे, परवान्यांचे नूतनीकरण करणे, कर आकारणी करणे, वाहनांची मालकी हस्तांतर करणे, आंतरराष्ट्रीय वाहन परवाना उपलब्ध करून देणे आदी कामांचा त्यांत समावेश आहे.

पुण्यावर नामुष्की : ऍम्ब्युलन्स न आल्यानं रस्त्यावर एकाचा मृत्यू

 
 पुणे आणि पिंपरी-चिंचवड तसेच जिल्ह्यातील आरटीओचे कामकाज उद्यापासून सुरू होणार आहे. शासकीय कार्यालय सुरू करताना त्यात किती मनुष्यबळ ठेवायाचे, याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार त्यांचे पालन करण्यात येईल. 'रेड झोन'मध्ये आरटीओचे कोणतेही कामकाज होणार नाही. मात्र त्या बाहेरील क्षेत्रात आरटीओची नेहमीप्रमाणे कामे सुरू होतील, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले आहे 

- 'फुकट काम करा, नाहीतर राजीनामा द्या'; पुण्यातील आयटी कंपनीचा प्रताप!

पुणे, शहर आणि जिल्हयात मिळून एकूण सुमारे 65 लाख वाहने आहेत. राज्याला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या अनेक विभागांपैकी आरटीओ हा एक प्रमुख विभाग आहे. लॉक डाऊनच्या काळात आंतरराज्य, आंतरजिल्हा प्रवासासाठी आरटीओ कार्यालयाने संबंधितांना डिजिटल पास उपलब्ध करून दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण! 11 सप्टेंबरला पुन्हा दर कोसळणार? जाणून घ्या ताजी अपडेट

‘त्याला माझी इनसिक्युरिटी वाटायची’; अनेक वर्षांनंतर नीना गुप्तांनी उघड केलं गुपित, म्हणाल्या...'माझ्यापेक्षा जास्त...'

ChatGPT's 80s Photo Trend: Instagram वर व्हायरल होतोय 'ChatGPT ’80s Photo Trend'; 'हा' सोपा प्रॉम्प्ट वापरून तयार करा तुमचा ८० च्या दशकातील रेट्रो लूक!

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Share Market Today: इराणच्या अमेरिकेला धमकीने शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; कोणत्या शेअर्सला मोठा फटका?

SCROLL FOR NEXT