rto
rto sakal news
पुणे

पुणे : 'आरटीओ'चे कामकाज होणार मंगळवारपासून सुरू

सकाळ वृत्तसेवा

पुणे ः प्रादेशिक परिहन कार्यालयाचे कामकाज मंगळवारपासून (ता. ८) ५० टक्के क्षमतेने सुरू होणार आहे. त्यामुळे लर्निंग लायसन, पर्मनंट लायसन, लायसनचे नुतनीकरण आदी विविध प्रकारची नागरिकांची होऊ शकतील. मात्र, त्यासाठी parivahan.gov.in या संकेतस्थळावरून नागरिकांना अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. सुमारे तीन महिन्यांनी आरटीओमधील कामे आता सुरू होतील. कोरोनाच्या लॉकडॉऊनमुळे १४ मार्चपासून आरटीओच्या कामांवर निर्बंध आले होते. मात्र, आता अनेक निर्बंध शिथिल झाल्यामुळे परिवहन आयुक्त कार्यालयाने दिलेल्या आदेशानुसार पुण्यातील आरटीओचे काम ५० टक्के क्षमतेने सुरू होणार आहे. लायसन नुतनीकरण, पत्त बदल, दुबार प्रत, इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन, वाहन नोंदणी, हस्तांतरण, कर्ज बोजा उतरविणे- चढविणे, नोंदणी प्रमाणपत्र दुबार प्रत, पत्ता बदल, नोंदणी नुतनीकरण आणि परवाना विषय सर्व कामकाज, खटला विषयक सर्व कामकाज मुख्यालय, आळंदी रस्ता आणि आयडीटीआर (भोसरी) येथे सुरू होणार आहे. मात्र, शिबिर कार्यालयाचे कामकाज १० जूनपासून सुरू होईल, अशी माहिती प्रादेशिक परिहवन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली.

कामकाज ५० टक्के क्षमतेने होणार असल्यामुळे लर्निंग लायसनचा कोटा ७५० वरून ३५०, पर्मनंट लायसनचा कोटा ५६० वरून २८०, कार लायसनचा कोटा ४०० वरून २०० करण्यात आला आहे. दिवे येथील योग्यता प्रमाणपत्र कोटा आता टुरीस्ट टॅक्सिंसाठी ३०, बससाठी ५०, रिक्षांसाठी ६०, जड वाहनांसाठी १२० तर, मध्यम जड वाहनांसाठी ४० असेल. आरटीओ कार्यालयात प्रवेश करण्यासाठी नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक असेल तसेच नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचेही पालन करावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.

वेबसाईटवरून अपॉइंटमेंट

लायसन, आरसी (रजिस्ट्रेशन सर्टिफिकिट) विषयक कामांसाठी नागरिकांनी parivahan.gov.in या संकेतस्थळावर जायचे आहे. त्यावर लायसन विषयक कामांसाठी ‘सारथी’वर तर, आरसीसाठी ‘वाहन’विभागातून नागरिकांनी अपॉइंटमेंट घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT