Bhama_Askhed_Dam 
पुणे

भामा-आसखेडचा नवा वाद; सत्ताधारी भाजप हडपसरकडे वळविणार पाणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भामा-आसखेड योजनेच्या उद्घाटनाचा वाद वाढला असतानाच या भागाला लष्कर जलकेंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर तो आता हडपसर वानवडी भागाला वळविण्याचा आग्रह महापालिकेतील सत्ताधारी भाजपने धरला आहे.

वडगांवशेरी भागाला सोडले जाणारे रोजचे दोनशे 'एमएलडी' हडपसरला हवे, अशी मागणी भाजपच्या नगरसेविक कालिंदा पुंडे यांनी केली आहे. तसे झाल्यास संपूर्ण पूर्व भागांत पुरेसे पाणी मिळणार असल्याचेही पुंडे यांनी स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, पूर्व भागातील रहिवाशांच्या हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे. मात्र, लष्कर जलकेंद्रातील पूर्व भागाच्या वाट्याचे पाणी अन्य परिसरांना दिल्यास आंदोलनाची भूमिकाही पुंडे यांनी घेतली आहे. 

नगर रस्त्यावरील काही भागांतील रहिवाशांना रोज पुरेशा प्रमाणात पाणी देण्यासाठी आखलेल्या भामा-आसखेड योजनेचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या धरणातून पाणीपुरवठा होणार असून, त्याच्या अंतिम चाचण्याही पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे पुढच्या काही काही दिवसांत योजनेतून पाणीपुरवठा होईल. त्यानंतर लष्कर जलकेंद्रातून या भागांना होणारा पाणीपुरवठा बंद होणार आहे. 

सध्या पूर्व भागासाठी खडकवासल्यातून लष्कर जलकेंद्रात सुमारे चारशे एमएलडी पाणी घेतले जाते. त्यातील दोनशे एमएलडी पाणी भामा आसखेडमधून उचलले जाईल. त्यामुळे लष्कर केंद्रातील पाणी अन्य भागाला पुरविण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. त्याआधी या केंद्रातून पाणी पूर्व भागाला मिळाले पाहिजे, असे पत्र नगरसेविका पुंडे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना दिले आहे. 

पुंडे म्हणाले, "लष्कर जलकेंद्रातून येरवडा, वडगावशेरी, खराडी चंदननगरसह, हडपसर, वानवडी आणि परिसरांना पाणीपुरवठा करण्याचा उद्देश आहे. त्यामुळे भामा आसखेडमधून पाणीपुरवठा सुरू झाल्यास निम्मा पाणीसाठा हडपसर, वानवडीसाठी वापरावा. '' 

लष्कर जलकेंद्रातून नियोजित भागांना सुरळीत आणि पुरेशा प्रमाणात पाणी पुरविण्यात येत आहे. मात्र, जेव्हा, भामा आसखेड प्रकल्प सुरू होईल; लष्कर केंद्रासाठी कमी पाणी घेतले जाईल. ज्यामुळे सध्याच्या वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा करणे शक्‍य होणार आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा खात्याकडून सांगण्यात आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT