SPPU_Convocation 
पुणे

विद्यार्थ्यांनो, यंदा पुणे विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा होणार ऑनलाईन; कॉन्वोकेशनसाठी करा अर्ज!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ दरवर्षी मोठ्या दिमाखात पदवीप्रदान सोहळा पार पडत असतो. मात्र यंदा या सोहळ्यावर 'कोरोना'मुळे विरजन पडले असून, यंदा ऑनलाईन दीक्षांत सोहळा होणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाने स्पष्ट केले आहे. पदवी प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे विद्यापीठातून दरवर्षी किमान तीन ते साडे तीन लाख विद्यार्थी पदवी प्राप्त करून उत्तीर्ण होतात. अशा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. पुणे विद्यापीठाचा हा समारंभ ऑगस्ट महिन्यात होणे अपेक्षित आहे. 

अशी आहे अर्ज करण्याची प्रक्रिया
पदवीप्रदान समारंभासाठी पदवी/पदविका प्रमाणपत्र प्राप्त करू इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 

यासाठी पुढीलप्रमाणे विद्यार्थी अर्ज करू शकतात : 
१३ जुलै २०२० ते २० जुलै २०२० पर्यंत (नियमित शुल्कासह) 
२१ जुलै २०२० ते २५ जुलै २०२० पर्यंत (विलंब शुल्कासह) विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज योग्य शुल्कासह भरणे आवश्यक आहे. अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच २० जुलै २०२० पासून 'Supplementary Convocation Degree Certificate' ही लिंक पदवीप्रदान समारंभ होईपर्यंत बंद राहील. अधिक माहिती विद्यापीठाच्या convocation.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

"पदवीप्रदान समारंभ ऑनलाईन पद्धतीने  घेतला जाणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांची पदवी/पदविका प्रमाणपत्र त्यांनी अर्जामध्ये नमूद केलेल्या पत्त्यांवर स्पीड पोस्टद्वारे पाठविण्यात येणार आहे."
- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ विभाग

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata News: चंद्रशेखरन यांचा U-Turn? पुन्हा Tata चेअरमनपदी निवड! निर्णय होताच शेअर्स 5% वाढले; नेमकं काय घडलं?

UPI MDR 2026 : अमेरिकेच्या दबावामुळे युपीआय वर एमडीआर? केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Asian Games 2026 Cricket : पाकिस्तानला दुबळ्या थायलंडने रडवले, शेजारी २ चेंडू राखून कसेबसे जिंकले; चीन न खेळताच स्पर्धेबाहेर

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमवर दुःखाचा डोंगर; लेखकाचं अकस्मात निधन, सचिन गोस्वामींची भावुक श्रद्धांजली

Latest Marathi News Update : आम्ही ECI च्या विवेकाधिकाराची जागा घेऊ शकत नाही - सुप्रीम कोर्टाचं महत्वाचं निरीक्षण

SCROLL FOR NEXT