Pune-University 
पुणे

विद्यार्थी-पालकांसाठी आनंदाची बातमी; शुल्कवाढीबाबत पुणे विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय!

ब्रिजमोहन पाटील

पुणे : 'कोरोना'मुळे अडचणीत आलेल्या विद्यार्थी व पालकांसाठी आनंदाची बातमी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यंदा नवीन शुल्क रचना केल्याने शुल्कवाढ झाली होती. मात्र, आता या शुल्कवाढीला एका वर्षासाठी स्थगिती देण्याचा निर्णय विद्यापरिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत अंतिम निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत होणार आहे. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता.२३) झूमद्वारे विद्या परिषदेची बैठक झाली. विद्यापीठ प्रशासनाने शुल्क रचनेचा प्रस्ताव सादर केला असता त्यास मान्यता देण्यात आली. यामुळे अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमात ५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काही महिन्यांपूर्वी विद्यापीठ प्रशासनाने ही शिफारस केली, तेव्हा यास विद्यार्थी संघटनांनी कडाडून विरोध केला होता. त्यावेळी ९ वर्षानंतर ही शुल्क रचना केल्याने ती अन्यायकारक नाही, असे विद्यापीठाने सांगितले होते. 

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन शुल्क वाढ करू नये, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केली होती. त्यावर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यामध्ये कोरोना'मुळे पालकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर झाला तरी यास एका वर्षासाठी स्थितीत दिली पाहिजे, अशी मागणी अनेक सदस्यांनी केली. त्यास विद्यापीठ प्रशासनानेही याबाबत तयारी दर्शविली आहे. त्यामुळे २०२०-२१ मध्ये जुनेच शुल्क संस्थांना आकारावे लागणार आहे. 

''विद्यापीठाने आज नवीन शुल्क रचना प्रस्ताव मंजूर केला, पण
कोरोनाच्या परस्थितीमुळे सर्वच विद्यार्थी आणि पालक अडचणीत आहेत. त्यामुळे या नवीन शुल्क रचनेची अंमलबजावणी यंदा पासून न करता पुढील वर्षापासून करावी. यंदा जुन्या पद्धतीनेच शुल्क घेतले जाईल. अशी शिफारस व्यवस्थापन परिषदेला केली आहे. त्याबाबत बैठकीत अंतिम निर्णय होईल.
- डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, पुणे विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime : मुंबईत वन्यप्राण्यांची तस्करी उघड? जुहूत घरातून जिवंत मगरीसह कासव जप्त; २९ वर्षीय इम्रान शेख पोलिसांच्या ताब्यात

Viral Video: हायवेवर थरारक स्टंट करत होती ताई, पण क्षणात घडले असं काही की व्हिडिओ पाहून धक्का बसेल

Kolhapur Mayor Results : कोल्हापुरात महायुतीचा दबदबा! महापौरपदी भाजपच्या रुपाराणी निकम, तर उपमहापौरपदी अक्षय जरग यांची बाजी; काँग्रेसचा पराभव

चार दिवसांत पत्नी गर्भवती कशी राहू शकते? आर्मीत असलेल्या पतीची थेट हायकोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?

Canada Work Permit Rules: कॅनडामध्ये नोकरी करायची आहे? मग 'ही' चूक करू नका, नाहीतर देश सोडावा लागेल...

SCROLL FOR NEXT