पुणे

पुणे जिल्ह्यातील शिवांकितच्या धाडसाचे सगळ्यांनाच कौतुक

नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे : राहत्या घरासमोर असलेल्या लोखंडी ग्रीलमध्ये अचानक विजप्रवाह संचारलेला होता...आई ग्रीलला चिकटलेली दिसली....तिला ग्रीलपासून दूर ओढताना आजोबा चिकटलेले... अशा कठीण व विचित्र प्रसंगात न घाबरता प्रसंगावधान दाखवून व शाळेत शिकविलेल्या प्रथमोपचाराच्या धड्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत आई व आजोबांची  सुखरूप सुटका करणाऱ्या धानोरे (ता. शिरूर) गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता सहावीत शिकणाऱ्या अकरा वर्षाच्या "शिवांकित विजय माशिरे" या विद्यार्थ्यांचे शाळेतील गुरुजनांनी विशेष कौतुक करून पाठीवर शाबासकीची  थाप दिली. 

पुणे

यावेळी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व श्यामची आई हे पुस्तक देऊन गुरुजनांनी शिवाकीतचा सत्कार केला. यावेळी मुख्याध्यापक शंकर शिंदे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते अनिल पलांडे, दत्तात्रय वाडघुले, संभाजी भालेराव, नवनाथ भुजबळ, विजय माशिरे आदी उपस्थित होते. शिवांकितच्या शौर्याचे, धाडसाचे व पराक्रमाचे विशेष कौतुक आमदार ऍड. अशोक पवार व ग्रामस्थांनी केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत सविस्तर माहिती अशी की, धानोरे (ता. शिरूर) येथील शेतातील वस्तीवर राहणारे माशिरे हे शेतकरी कुटुंब. येथील शेतकरी रुपाली विजय माशिरे व आजोबा सोनबा दत्तात्रय माशिरे यांच्या घरासमोर लोखंडी ग्रील असून, या ग्रीलमध्ये अचानक वीज प्रवाह आला होता. दोघांनाही विजेचा मोठा धक्का बसला. हे दृश्य शिवांकितने पाहीले. त्याने प्रसंगावधान दाखवत लाकडी दांडक्याच्या मदतीने आईची व आजोबांची सुखरूप सुटका केली.

विजेच्या धक्क्याने जखमी झालेल्या रुपाली माशिरे व आजोबा सोनबा माशिरे यांना तातडीने तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. प्रसंगावधान दाखवून शिवांकितने आई व आजोबांना जीवदान दिले त्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

Mouni Roy: एका दिवसात तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अशी झाली होती अवस्था

PBKS vs CSK : चेन्नई संघासमोर गोलंदाजीचे प्रश्नचिन्ह; मागील सामन्यात पराभव झालेल्या पंजाबविरुद्ध पुन्हा सामना

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT