pune road1 
पुणे

पुण्यात दुकानं उघडली; पेट्रोल मिळू लागलं, आता वाहतूक कधी सुरू होणार?

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे शहरामध्ये प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर दुकाने उघडण्यासाठी महापालिकेने परवानगी दिली. सर्व प्रकारच्या वाहनांना आता पेट्रोल-डिझेल उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक आता सुरू कधी होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

पुण्यात 25 मार्चपासून लॉकडाउनची कडक अंमलबजावणी सुरू आहे. केंद्र सरकारने गेल्या आठवड्यामध्ये लॉकडाउनमधून काही प्रमाणात नागरिकांना शिथिलता दिली आहे. त्यानंतर राज्य सरकारनेही काही आदेश काढून शिथिलीकरणाचे सूचना महापालिकेला दिल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने आदेश काढले आहेत. आयुक्त शेखर गायकवाड यांनी थोड्या वेळापूर्वी आदेश काढून शहरातील प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर विविध प्रकारची दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 दरम्यान खुली राहतील असे स्पष्ट केले आहे. तर प्रतिबंधित क्षेत्रातील जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने सकाळी दहा ते दुपारी दोन दरम्यान उघडी राहणार आहेत. 

या आदेशापुर्वी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी देखील एक आदेश प्रसिद्ध केला त्या आदेशानुसार नागरिकांना त्यांच्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध होणार आहे. त्यासाठी सकाळी सात ते संध्याकाळी सात ही वेळ निश्‍चित करण्यात आलेली आहे. महामार्गांवर ही पेट्रोल आणि डिझेल विक्री सुरू राहणार असून त्याचे आदेश स्वतंत्रपणे देण्यात आले आहेत. 

नागरिकांना ओळखपत्र न विचारता पेट्रोल आणि डिझेल देण्यात यावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी या आदेशामध्ये स्पष्ट केले आहे. याचबरोबर शहरांमध्ये मद्य विक्रीच्या दुकानांना ही परवानगी देण्यात आलेली आहे त्यांच्यासाठी सकाळी 10 ते सायंकाळी 6 ही वेळ निश्‍चित करण्यात आली आहे. तर शिधापत्रिकेवर धान्य विक्री करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानांना सकाळी आठ ते रात्री आठ या दरम्यान राज्य सरकारने परवानगी दिली असली, तरी त्या-त्या भागातील स्थानिक झोननुसार महापालिकेने त्यांना परवानगी दिलेली आहे. ही दुकाने कंटेनमेंट क्षेत्रात असतील तर त्यांना सकाळी दहा ते दुपारी दोन दरम्यान धान्य विक्री येणार आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

पेट्रोल, डिझेल मिळाले, दुकाने उघडली आता वाहतूक कधी सुरू होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. शहर पोलिसांकडे याबाबत विचारणा केली असता वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्या मुळे आता पोलिस वाहतुकीबाबत काय भूमिका घेतात, यावर शहरातील लॉकडाउनचे भवितव्य अवलंबून असेल. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : बारामतीमध्ये पुन्हा विमान दुर्घटना, विमानतळावर प्रशिक्षण विमान कोसळलं

Maharashtra Teacher Promotion: शिक्षक पदोन्नतीचा मार्ग मोकळा; ‘टीईटी’ची अट कायम; ३१ पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश

Mumbai: मुंबईतील पदपथांवरील अतिक्रमणे १५ दिवसांत हटवणार, निष्काळजी अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार; महापालिकेची नवी उपाययोजना

Satara District Bank: सातारा जिल्हा बँक निवडणुकीआधी राजकीय खलबतं; सुनेत्रा पवार-उंडाळकरांची ‘कमरा बंद’ चर्चा चर्चेत

World Athletics U20 Championships: वर्ल्ड अंडर-२० ॲथ्लेटिक्समध्ये भारताचा डंका; आशिष यादवला रौप्य, तर शाहनवाज खानने जिंकले कांस्य पदक!

SCROLL FOR NEXT