handicapped 
पुणे

नोकरीसाठी दिव्यांगांचा कौशल्य विकास

ब्रिजमोहन पाटील

पुणे - 'पदवी पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या शोधात आहे, पण दिव्यांग असल्याने नोकरी मिळेल का? असा प्रश्‍न मला पडायचा, बोलताना भीती वाटायची. आता नोकरीसाठीचे कौशल्य आत्मसात केल्यानंतर आत्मविश्‍वासाने मुलाखती देण्यास सुरवात केली असून, यात नक्की यशस्वी होईल, असे मृणाल मुळे ही तरुणी सांगत होती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एंटरप्रनरशीप डेव्हलपमेंट अँड रिहॅबिलिटेशन सेंटर फॉर ऑल कॅटेगिरीज ऑफ दिव्यांग पर्सन (ईडीएआरसीएच-ईडार्च) संस्थेने यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. कोरोनामुळे बाहेर फिरण्यावर मर्यादा आलेल्या असताना "ईडार्च'ने ऑनलाइन व्यासपीठावरून दिव्यांग तरुणांचे कौशल्य विकसित (सॉफ्ट स्कील) करण्यासाठी खास प्रशिक्षण वर्ग सुरू केला आहे.

शारीरिक अंपगंत्व, कमी ऐकू येणे, मूकबधिर असणे, अंध यासह इतर दिव्यांगांना समाजामध्ये वावरणे अवघड जात असते. चांगले शिक्षण घेणे, त्यानंतर स्वतःचे करिअर घडवणे मोठे आव्हान असते. शारीरिक अपंगत्वामुळे लोक व्यवस्थित बोलतील का?, आपल्याकडे बघून हसतील का?, शारीरिक मर्यादांमुळे गैरफायदा घेतील का अशा शंकांमुळे दिव्यांगांमध्ये न्यूनगंड तयार होतो. त्यामुळे ते समाजात आत्मविश्‍वासाने फिरू शकत नाहीत. त्यासाठी हे प्रशिक्षण आवश्‍यक आहे.

डीएसके प्रकरण : फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट कोर्टात दाखल करा; वकिलांनी केली मागणी

काय आहे प्रशिक्षणात
"ईडार्च'तर्फे साधारणपणे दीड महिन्याचे एक प्रशिक्षण वर्ग घेतले जाते. मुलाखतीमध्ये स्वतःची ओळख कशी करून द्यावी?, आपले म्हणणे कसे प्रभावीपणे मांडावे, इंग्रजी संभाषणाचा सराव करून घेतला जातो. वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले आहे. त्यातून दिव्यांगांना आपण नोकरी मिळवू शकतो, समोरच्या व्यक्तींना आपले म्हणणे पटवून देऊ शकतो, असा आत्मविश्‍वास तयार होतो. या वर्गात एकावेळी 18 जणांना प्रशिक्षण दिले जाते, असे अनिता घाटणेकर यांनी सांगितले.

MPSC ची परीक्षा पुढे ढकलली ते ठीक, पण पुढची भूमिका काय?

प्रशिक्षण घेण्यासाठी काय करावे
दिव्यांगांना व्यवसाय असो की नोकरी यासाठी प्रशिक्षण आवश्‍यक आहेच, त्यासाठी "ईडार्च'ने मोफत प्रशिक्षणासाठी गुगल लिंक तयार केली आहे. ही https://forms.gle/v3HjpDibJipy3sKE9 लिंक भरून प्रशिक्षणासाठी नोंदणी करावी.
अधिक माहितीसाठी डॉ. दिलीप देशपांडे 9823082671, 9850924747, अनिता घाटणेकर 9881714890 यांच्याशी संपर्क साधावा.

'माझा ग्राफिक्‍स डिझाईनचा व्यवसाय आहे. कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण घेतल्यानंतर माझ्यात बराच बदल झाला आहे. दिव्यांगांना समाज लगेच स्वीकारतो असे नाही, त्यामुळे अशा प्रकारचे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे.''
- इरफान पठाण, दिव्यांग आर्टिस्ट

'दिव्यांगांना रोजगार मिळवत असताना कौशल्य विकासा अभावी अडथळे निर्माण होत आहेत, ते ओळखून "ईडार्च'ने ऑनलाइन कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिर सुरू केले आहे. ते कष्टाने पदवीधर होतात, पण लगेच नोकरी मिळत नाही, त्यामुळे ते नैराश्‍यात जातात. त्यांना आवश्‍यक कौशल्य दिल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होतील यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे,
- डॉ. दिलीप देशपांडे, अध्यक्ष, "ईडार्च'

देशभरातील दिव्यांगांची स्थिती

  • एकूण लोकसंख्येच्या तुलनेत दिव्यांग - 6.89 टक्‍के
  • शिक्षित दिव्यांग - 18.5 टक्के
  • अशिक्षित पण काम करू शकणारे - 76. टक्के
  • परावलंबी - 5.5 टक्‍के

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT