Panchnama
Panchnama 
पुणे

तारतम्याची ऐशी की तैशी

सु. ल. खुटवड

‘अहो, कधी तरी तारतम्याने वागत जा. तुमच्या अशा वागणुकीने मला माहेरी तोंड दाखवायला जागा राहिली नाही.’ बायकोने डोळ्यात पाणी आणत म्हटले. ‘हे बघ, मी सत्यवचनी माणूस आहे, जे खरे आहे, तेच बोलतो.’ आम्ही बाणेदारपणे उत्तर दिले. त्यावर बायकोने भांड्यांची आदळआपट करीत आणि मुलांच्या पाठीत धपाटे घालून प्रत्युत्तर दिले. मग आम्हीही कानात हेडफोन घालून किशोरकुमारचे ‘जिंदगी एक बेवफा है’ हे गाणं ऐकत बसलो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज सकाळी बायकोच्या मामाला भेटण्यासाठी आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. त्यांच्या स्वादुपिंडाचे ऑपरेशन झाले होते. ‘मामा, काळजी घ्या बरं का. मागच्या आठवड्यात याच आजारानं माझा मित्र दगावला आहे आणि मागच्याच महिन्यांत माझी चुलतमावशीही याच आजाराने गेली.’ असे म्हणून आम्हाला हुंदका अनावर झाला. त्यावर आम्ही बळंबळं स्वत:ला सावरलं. ‘मामा, मृत्युपत्र तयार केलंय ना? नाहीतर त्यावरून घरात भांडणं होतात. त्यामुळे केलं नसेल तर लगेचच करून घ्या. माझा ओळखीचा वकील आहे. त्याला लगेचच बोलवू का? कमी खर्चात...’’ आमचं वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच दोघांनी आम्हाला रुमबाहेर हाकललं. घरी आल्यानंतर ‘कसे आहेत मामा’, असं न विचारता बायकोने थेट आमच्यावर हल्ला चढवला. आता यात आमचा काय दोष आहे का? नेहमी खरे बोलावे, ही शाळेपासूनची शिकवण आम्ही फक्त अंमलात आणली. एवढंच! 

‘मी मैत्रिणीकडे हळदी कुंकवाला चालले आहे. तासाभरात येते. फ्रीजमधील दूध बाहेर काढून तापवून ठेवा म्हणजे नासणार नाही,’ बायकोने सूचना केली. ‘अगं मलाही तुझ्याबरोबर घेऊन चल ना. मला एकट्याला येथे खूप बोअर होतं. तिथं माझं मन एकदम फ्रेश राहील.’ मात्र, ही सूचना तिने फेटाळून लावली.

‘कपडे, दागिने वा इतर खरेदी असली की आम्ही सोबत पाहिजे पण हळदीकुंकवाच्या समारंभाला मात्र मी नको. असं का?’ आम्ही मनातल्या मनात म्हटले. बायको निघून गेल्यानंतर आम्ही फ्रीजमधून दुधाचं भांडं बाहेर काढलं व तापविण्यासाठी गॅसवर ठेवलं. त्यानंतर मोबाईलवर गेम खेळत बसलो. वीस-पंचवीस मिनिटांनी गॅसजवळ गेलो तरीही दूध उकळले नव्हते.

त्यामुळे आम्ही अजून वाट पहायचे ठरवले. हल्ली भैय्या दुधात पाणी घालत नसल्याचे जाणवले. इतके दिवस आम्ही त्याच्यावर ओरडत असल्याचा फायदा झाला म्हणायचा. थोड्याच वेळात अचानकपणे सासू-सासरे दारात दत्त म्हणून उभे होते. त्यांचे तोंड भरून आम्ही स्वागत केले. त्यांना दोन ग्लास पाणी दिले व चहाच्या तयारीला लागलो. चहा उकळल्यानंतर गॅसवरील दूध चहात ओतले व सासू-सासऱ्यांना चहा दिला. मी केलेल्या आदरतिथ्यामुळे ते दोघेही भारावले. मात्र, तोंड वाकडे करीतच ते चहा पिऊ लागले. तेवढ्यात बायकोही आली. ‘अगं तू दमून आली आहेस. तू ही चहा घे,’ असे म्हणून आम्ही चहा गाळू लागलो. बायको सहज किचनजवळ आली व पाल बघावी तशी किंचाळली. ‘अहो, मी तुम्हाला दूध तापवायला सांगितले होते. तुम्ही इडलीचे पीठच तापवलंत. हद्द झाली बाई या माणसाची! कधी तरी तारतम्य बाळगत जा...’ बायकोची पिठाची गिरण चालू झाल्यानंतर आम्ही मुकाट्याने हेडफोन कानाला लावून किशोरकुमारची दर्दभरी गाणी ऐकू लागलो.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लॅन बी काय आहे? अमित शाह काय म्हणाले जाणून घ्या...

IPL 2024: हैदराबादनेही प्लेऑफचं तिकीट केलं पक्कं! आता RCB vs CSK सामना लावणार चौथ्या संघाचा निकाल, पाहा कसं आहे समीकरण

Devendra Fadanvis: लोकसभेनंतर आता फडणवीसांनी सांगितलं विधानसभेचं गणित; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

Char Dham Yatra 2024: सावधान नाहीतर रीलच्या नादात जाल जेलमध्ये...उत्तराखंड सरकारने घेतला मोठा निर्णय, अधिकारी तळ ठोकून

Nepal Bans: आता नेपाळनेही MDH, EVEREST मसाल्यांवर केली मोठी कारवाई; आयात आणि विक्रीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT