Solar-SPPU
Solar-SPPU 
पुणे

आता 'सोलर वॉल'पासून मिळणार 'सोलर एनर्जी'; पुणे विद्यापीठात प्रायोगिक केंद्राची उभारणी!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : इमारतींच्या छपरांवर किंवा मोकळ्या मैदानात पॅनेल बसवून सौरऊर्जेची निर्मिती सर्वत्र केली जाते, पण उंच इमारतीच्या काचेच्या भिंतीद्वारेही सौरऊर्जेची निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान भारतात प्रथमच आले असून, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रायोगिक केंद्र (एक्सिपिरिअन्स सेंटर) उभारण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते येत्या रविवारी (ता.१ मार्च) होणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ऊर्जा अभ्यास प्रणाली विभागात (स्कूल ऑफ एनर्जी स्टडीज) हे केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राच्या चारही भिंतींवर वैशिष्ट्यपूर्ण काचा बसवण्यात आल्या आहेत. या चार भिंतींद्वारे दररोज १४-१५ युनिट उर्जा निर्मिती होऊ लागली आहे. 

सोलर स्केप एन्टरप्रायझेस एल.एल.पी. या कंपनीने चीनमधून हे तंत्रज्ञान आणले आहे. सुरवातीच्या काळात येथे या काचांची भिंत उभारण्यासाठी आवश्यक साहित्याची जुळणी आणि पुढील टप्प्यात उत्पादनही केले जाणार आहे. देशातील हा असा पहिलाच उपक्रम आहे. याबाबत कंपनीचे संचालक दीपक गद्रे, अर्जुन गद्रे आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ संचालक डॉ. रमेश ढेरे यांनी सांगितले की, सध्या सौरउर्जेसाठी वापरण्यात येणा-या फोटोव्होल्टेक (पीव्ही) तंत्रज्ञानाच्या तुलनेत हे कॅन्डेमिअम टेलेरॉइड (सीडीटीई) तंत्रज्ञान चीन आणि युरोपीय देशांमध्ये गेल्या पाच वर्षांपासून जास्त वापरले जाऊ लागले आहे. या तंत्रज्ञानामुळे उंच इमारतीच्या छतापेक्षा जास्त असलेल्या भिंतींच्या भागांचा ऊर्जानिर्मितीसाठी वापर करणे शक्य झाले आहे. तसेच या भिंती जास्त सुरक्षित असतात.

'पॉवर ग्लास' असे रास्त वर्णन होऊ शकणाऱ्या या काचेच्या भिंतींमुळे इमारतीतील उष्णता कमी होतेच, शिवाय अपारंपरिक उर्जानिर्मिती केल्यामुळे संबंधित इमारतीला 'ग्रीन रेटिंग'ही मिळते. विविध रंगांमध्ये या काचा उपलब्ध असून त्यांची दृश्यमानता हवी त्या प्रमाणात नियंत्रित करण्याची सुविधा आहे. तसेच सर्व प्रकारच्या हवामानामध्ये टिकण्याची या काचांची क्षमता आहे.   

विद्यापीठाच्या आवारात हे 'अनुभव केंद्र' उभारल्यामुळे उर्जा विभागाच्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. 

येत्या रविवारी (१ मार्च) सकाळी ९ वाजता केंद्राच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार असून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल पवार आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. हे अनुभव केंद्र उभारण्यासाठी विद्यापीठाच्या ऊर्जा अभ्यास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. संदेश जाडकर व प्रतिष्ठित प्राध्यापक डॉ. सुभाष घैसास यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा प्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची SIT सोबत बैठक

SCROLL FOR NEXT