पुणे

पुण्यातील सोनित सिसोलेकरला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार जाहीर

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुण्यातील सोनित सिसोलेकर याने नासाच्या एका स्पर्धेत मंगळग्रहावरील माती लाल का झाली यासंबंधी संशोधन सादर केले. यासह इतर स्पर्धांमध्ये त्याची चमक दाखविली, त्यामुळे त्याला राज्यपातळीवर, राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदकही मिळाले. त्याचा विज्ञानातील सातत्यपूर्ण कामगिरीला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे. 

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पंतप्रधान राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार जाहीर केला जातो. यंदा शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुण्यातील पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ८वीत शिकणाऱ्या सोनित याची बाल शौर्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे. 

भवतालाच्या कुतुहलातून पडणाऱ्या या प्रश्‍नांची योग्य उत्तरे मिळाली तर हीच जिज्ञासा मुलाच्या सर्वांगीण प्रगतीची भाग बनते. सोनितला लहानपणापासून दगडांची रचना, खडकांचे विविध प्रकार, पुण्यातील टेकड्या, मातीचा रंग अशा भोवतीच्या अनेक गोष्टींबद्दल जिज्ञासा आहे. त्याच्या याच कुतुहलाला पूरक वातावरण पालकांनी निर्माण केले. 

इंडियन नॅशनल सायन्स अँड इंजिनिअरिंग फेअरमध्ये झाडांच्या वाढीबाबत आवाजाचा काय परिणाम होतो यावर संशोधन केले होते. या संशोधनासाठी मला राष्ट्रीय व राज्य पातळीवर सुवर्णपदक व रौप्यपदक मिळाले आहेत, असे सोनितने ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले.

सोनितचे वडील संतोष सिसोलेकर म्हणाले की, सोनित सध्या पुण्यातील व दख्खनच्या पठारावरील लाव्हा ट्यूब या विषयावर संशोधन सुरू आहे. यामध्ये पृथ्वीवरील लाव्हा ट्यूब आणि चंद्रावरील लाव्हा ट्यूब यांचा अभ्यास सुरू आहे. मार्च महिन्यात होणाऱ्या लुणार प्लॅनेटरी सायन्स कॉन्फरन्समध्ये तो सहभागी होणार आहे. 

कोरोनामुळे दिल्लीत कार्यक्रम होऊ शकला नाही. पण आज पुरस्कार विजेत्या विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन संवाद साधला, त्यामुळे मी प्रेरित झालो असून, संशोधन क्षेत्रात ही माझी केवळ सुरुवात आहे. भविष्यात आणखी खूप पुढे जायचे आहे.
- सोनित सिसोलेकर

घरातच केली प्रयोगशाळा 
सोनितचे बाबा त्याला लहानपणी पुण्यातील टेकड्यांवर फिरायला घेऊन जायचे, तेव्हा तेथील दगडांकडे कुतूहलाने पाहात असत, त्यामध्ये काय आहे हे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा. घरात त्याला खेळणी आणल्यावर तो ती तोडून त्याच्या आतमध्ये काय आहे हे उत्सुकतेने पहायचा. सोनितमधील हे वेगळेपण त्याच्या आई-बाबांनी हेरले. त्यादृष्टीने त्याला पूरक वातावरण निर्माण करून दिले. काही संशोधन त्याने थेट गुहांमध्ये जाऊन केले आहे. तर झाडांवरचे संशोधन करताना त्याने घरातच प्रयोगशाळा निर्माण केली होती, असे संतोष सिसोलेकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : हवामान खात्याचा मोठा इशारा! 28 राज्यांत जोरदार पावसाची शक्यता; ताशी 60 ते 70 किमी वेगाने वाहणार वारे, महाराष्ट्रात स्थिती काय?

Pune Traffic: अंगारकी संकष्टीत दगडूशेठ गणपती दर्शनासाठी गर्दी; पुणे मध्यवर्ती भागातील वाहतुकीत तात्पुरते बदल

MPSC Main Exam 2026 Postponed : MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 3 ऑक्टोबरपासून होणाऱ्या तीन महत्त्वाच्या मुख्य परीक्षा ढकलल्या पुढे; आयोग लवकरच जाहीर करणार नव्या तारखा

Latest Marathi News Live Update: ९० कोटींच्या निविदेसाठी आयुक्तांना धमकी

Jammu-Kashmir Assembly: जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा? विधानसभेत ठराव मंजूर, भाजपचा सभात्याग! काय बदल होणार?

SCROLL FOR NEXT