Corona-Check-Post 
पुणे

स्पेशल जॅकेट करणार चेकपोस्टवरील कर्मचाऱ्यांचे संरक्षण; महिंद्राने दिले १५०० जॅकेट्स!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विविध तपासणी नाक्यांवर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संरक्षक जॅकेटचे वाटप करण्यात आले आहे. यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) दीड हजार जॅकेट उपलब्ध करून दिली असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी शुक्रवारी (ता.१५) सांगितले.

जिल्हा परिषदेच्यावतीने पुणे जिल्ह्याच्या सीमेवर विविध ठिकाणी १११ तपासणी नाके सुरु करण्यात आलेले आहेत. हे सर्व नाके २४ तास कार्यरत असतात. यासाठी तीन शिफ्टमध्ये अधिकारी आणि कर्मचारी काम करीत आहेत.

सांगली जिल्ह्यातील एका तपासणी नाक्यावर कार्यरत असलेल्या एका शिक्षकाला भरधाव ट्रकने उडवले होते. त्यात त्या शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांना संरक्षक जॅकेटचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पानसरे यांनी सांगितले. 

या नाक्यांवरील कर्मचारी हे पुणे जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची संपर्क विरहित तापमाफकाच्या माध्यमातून तपासणी करत आहेत. जिल्ह्यात कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून हे तपासणी नाके सुरू करण्यात आलेले आहेत.

दरम्यान, या नाक्यांवर कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी स्थानिक ग्रामपंचायतींमार्फत सावलीसाठी मंडप, लाईट, पिण्याचे पाणी आणि शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी महिंद्रा कंपनीचे आनंद महिंद्रा आणि श्रीकुमार नायर यांचे आभार मानले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दक्षिण आफ्रिकेत बारमध्ये अंदाधुंद गोळीबार; १७ जणांचा मृत्यू, १५ जखमी

Mumbai News: मुंबईतील शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी, आरोपी ताब्यात; घटनेने राजकारणात खळबळ

Teacher Assault Case: पत्नीला कॉल का करतोस? वाहतूक पोलिसांसमोर शिक्षकावर चाकू व कड्याने हल्ला

Maharashtra ST concession: प्रवासी कार्डद्वारेच ऑक्टाेबरपासून सवलत ; एसटीकडून क्यूआर कोड पावती महिनाभर ग्राह्य धरणार

दुबईत सोन्याचं एटीएम लावणारा अशर्फी सेठ कोण होता? दाऊदला ‘डॉन’ बनवण्यात होती मोठी भूमिका

SCROLL FOR NEXT