Pune-University 
पुणे

विद्यार्थ्यांनो, पुणे विद्यापीठाने प्रवेश परीक्षांबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात चालणाऱ्या विविध अभ्यासक्रमांसाठी गेल्या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या ऑनलाईन प्रवेश परीक्षांना उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच, ठिकठिकाणी परीक्षा केंद्रे असल्याने बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना सहजपणे परीक्षा देता आल्या.

या पार्श्वभूमीवर या वर्षीसुद्धा विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर (यूजी व पीजी) परीक्षांसाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहेत. याबाबतचे वेळापत्रक येत्या आठवड्याभरात जाहीर करण्यात येईल, अशी माहिती कुलगुरू प्रा. नितीन करमळकर यांनी दिली.

विद्यापीठाच्या आवारात असलेल्या विविध विभागांमध्ये चालणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी गेल्या वर्षीपासून ऑनलाईन प्रवेश परीक्षा घेणे सुरू करण्यात आले. पदवी आणि पदव्युत्तर अशा एकूण ९५ अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या. त्यासाठी राज्याच्या विविध भागात परीक्षा केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली होती. ही ऑनलाईन प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांसाठी सोयीची ठरली. त्यांना परीक्षांसाठी पुण्यात येण्याची आवश्यकता नव्हती, तर ते आपल्या गावाजवळ असणाऱ्या केंद्रावर परीक्षा देऊ शकले. त्यामुळे या परीक्षांना खूप चांगला प्रतिसाद लाभला.

या ९५ अभ्यासक्रमांसाठी सुमारे २६ हजार ५०० विद्यार्थी बसले होते. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने गुणवत्तेतही वाढ झाली. या परीक्षेच्या अशा जमेच्या बाजू ठरल्या. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षासाठीसुद्धा ऑनलाईन पद्धतीने प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याबाबतची घोषणा व सविस्तर कार्यक्रम पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येईल. त्याची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाईल, असे प्रा. करमळकर यांनी सांगितले.

पदविका व प्रमाणपत्र परीक्षा संबंधित विभागांद्वारेच

या व्यतिरिक्त पदविका (डिप्लोमा) व प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) अभ्यासक्रमांच्या मात्र संबंधित विभागांकडून थेट पद्धतीने घेण्यात येतील. या अभ्यासक्रमांची संख्या ५५ इतकी आहे, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2026

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

SCROLL FOR NEXT