SPTM survey only 35 percent for pedestrian safety in Pune
SPTM survey only 35 percent for pedestrian safety in Pune 
पुणे

पादचाऱ्यांच्या सोयीमध्ये पुण्यातील चौक काठावर पास!

मंगेश कोळपकर

पुणे : पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील चौकांमधील पायाभूत सुविधा जेमतेम 35 टक्केच असल्याचे सेव्ह पुणे ट्रॅफिक मुव्हमेंटच्या (एसपीटीएम) पाहणीत आढळून आले आहे. सुमारे 107 चौकांमध्ये त्यासाठी पाहणी झाली होती. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी किमान 20 सेकंद द्यावे लागतात. प्रत्यक्षात पुण्यात पादचाऱ्यांना 11 सेकंदच मिळत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वाहनांची सर्वाधिक संख्या असलेल्या या शहरात पादचाऱ्यांची सुरक्षितता महत्त्वाची असून त्यासाठी आणखी ठोस प्रयत्न करण्याची गरज असल्याचे अधोरेखित झाले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

पादचारी सिग्नल, रोड मार्किंग्ज आदी सुविधांची परिस्थिती नक्की समजावी, या उद्देशाने (एसपीटीएम) या स्वयंसेवी संघटनेने एक ते दहा जुलै दरम्यान नुकतीच एक पाहणी केली. पुणे शहरामध्ये सुमारे 260 चौकांमध्ये सिग्नल आहेत; परंतु सध्या कोरोनामुळे वाहतूक कमी असल्याने फक्त काही महत्त्वाच्या चौकांमधील सिग्नल सुरू आहेत. या पाहणीमध्ये 107 चौकांचा समावेश आहे. त्या चौकांमधील पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्‍यक घटकांचे "एसपीटीएम'ने सर्वेक्षण केले. त्यानुसार पुण्यातील चौकांना एकंदर 35 टक्के गुण मिळाले आहेत. शहरातील त्यामध्ये झेब्रा पट्ट्या आणि थांबा रेषांची परिस्थिती 74 टक्के समाधानकारक आढळून आली.

पादचाऱ्यांचे सिग्नल मात्र आवश्‍यकतेच्या केवळ 6 टक्केच संख्येने आहेत. इंडियन रोड कॉंग्रेसच्या (आयआरसी) मार्गदर्शकांनुसार रस्ता ओलांडण्यासाठी पादचाऱ्यांना निदान 20 सेकंद मिळायला हवेत, परंतु सरासरी फक्त 11 सेकंद मिळतात. पादचारी सिग्नलचे प्रोग्रामिंग फक्त 4 चौकांमध्ये समाधानकारक प्रकारे केलेले आहे, तर कमकुवत दृष्टीच्या लोकांसाठी कायद्याने आवश्‍यक असलेली गजराची व्यवस्था पुण्यात कोठेही नाही. त्यामुळे पादचारी सिग्नल व्यवस्थेला केवळ 19 % गुण मिळाले आहेत.

या दुरवस्थेच्या कारणांबद्दल "एसपीटीएम'चे हर्षद अभ्यंकर म्हणाले, ""वाहनांचे सिग्नल बंद पडल्याची तक्रार वाहतूक पोलिसांकडून नोंदवली जाते, परंतु पादचारी सिग्नल नादुरुस्त झाल्याची तक्रार नोंदवली जात नाही. अनेक पादचारी सिग्नल बंद पडलेले महानगरपालिकेच्या संबंधित विभागासही दिसायला हवेत आणि तक्रारीची वाट न पाहता ते दुरुस्त व्हायला हवेत. पादचारी हा वाहतुकीचा महत्त्वाचा घटक आहे हे वाक्‍य केवळ रस्ते सुरक्षा सप्ताहात फ्लेक्‍सवर लावण्यासाठी नसून ते आपल्या मनात बिंबायला हवं.''

या बाबत महापालिकेचे विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदूल यांनी सांगितले की, शहरातील सर्व सिग्नल्सचे सिंक्रोनायझेशन स्मार्ट सिटीच्या उपक्रमातंर्गत ऍडप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंटतंर्गत होणार आहे. त्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण झाल्यावर सिग्नलमध्ये पादचाऱ्यांसाठी पुरेसा वेळ देण्यात येणार असून सर्व सिग्नलचे सिंक्रोनायझेसनही करण्यात येईल.

सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंटच्या प्रमुख शिफारसी
- पादचाऱ्यांसाठी हिरवा- लाल दिव्यांमध्ये वेळेचे नेमके अंतर हवे
- पादचाऱ्यांसाठी सिग्नलमध्ये काऊंटडाऊन टायमर हवा
- सर्व सिग्नलचे सिंक्रोनायझेशन हवे
- अंध किंवा दृष्टी कमजोर असलेल्या पादचाऱ्यांसाठी सिग्नलला ऑडिओची सुविधा हवी

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : नाशिकच्या गंगापूर रोडवरील ICICI बँकेत चोरी

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT