Gunaratna Sadavarte
Gunaratna Sadavarte esakal
पुणे

सदावर्तेंनी पैसे कसे घेतले? पुण्यातील ST कर्मचाऱ्याचा गौप्यस्फोट

सकाळ डिजिटल टीम

पुणे : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फायदा घेत ॲड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavartes) यांनी कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचा प्रकार घडल्याचे कोर्टातील युक्तीवादात समोर आले आहे. त्यानंतर आता एसटी विभागात काम करणाऱ्या आणि त्यावेळी संपात सहभागी असलेल्या एका कर्मचाऱ्याने सदावर्ते यांनी पैसे कसे घेतले याची पोलखोल केली आहे. सकाळच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना कर्मचाऱ्याने सदावर्तेंनी पैसे कसे आणि कोणत्या स्वरुपात घेतले याचा खुलासा केला आहे.

डिसेंबर महिन्यापासून संपात सहभागी असलेले पुण्यातील एसटी कर्मचारी सदावर्तेंना पैसे देत होते. ही रक्कम कॅशच्या स्वरूपात मागितली जायची; असेही या कर्मचाऱ्याने सांगितले. पहिल्या महिन्यात 540 रुपये त्यानंतर प्रत्येकी कर्मचाऱ्यांकडून 300 रुपये अगाऊ रक्कम घेतली गेली. आंदोलनात सहभागी असलेल्या पुण्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी कॅश स्वरूपात रक्कम दिली. पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर, स्वारगेट विभागातील कर्मचाऱ्यांनी पैसे दिले. याची एक नोंदवही करण्यात आली होती. मी यामध्ये पैसै दिल्याचे सांगत सदावर्ते यांनी एसटीचं विलिनीकरण करुन देतो अशी हमी दिली होती, अशी व्यथा या कर्मचाऱ्याने सांगितली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल; ईव्हीएमची केली होती पूजा

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

Ajit Pawar: सोशल मीडिया त्याला चांगला जमतो; लहानपणापासूनच नौटंकी...; Viral Videoवरून अजितदादांचा रोहित पवारांवर निशाणा

SCROLL FOR NEXT