corona
corona 
पुणे

पुण्यातील बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करा; शिवसेनेची मागणी

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोथरुडमध्ये हॅप्पी कॉलनी परिसरात दहा वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या बिंदुमाधव बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाच्या आवारात अद्यावत कोविड केअर सेंटर त्वरित उभे करण्यात यावे व नागरीकांना त्यांच्या हक्काच्या आरोग्य सुविधा पुरवून दिलासा दयावा, अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख गजानन थरकुडे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे तसेच प्रशांत बधे, योगेश मोकाटे यांनी महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मंगळवारी केली. या रुग्णालयातील सहा मजल्याचे बांधकाम हे दहा वर्षापूर्वीच पूर्ण झाले आहे. आत्ता सध्या या रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर बाह्यरुग्ण विभाग कार्यान्वित असून त्याद्वारे प्राथमिक उपचार सुरु आहेत. या ठिकाणी सध्या कोरोनाचे लसीकरण केंद्र सुरु आहे. तत्कालीन आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या प्रयत्नातून हे रुग्णालय डिसेंबर २०११ मध्ये सुरु करण्यात आले. या ठिकाणी अजून १२५०० चौ.फुट अद्ययावत रुग्णालय उभे रहावे म्हणून महापालिकेच्या अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात आली होती. परंतु रुग्णालयाच्या वरील मजल्यावरील रुग्णालयासाठी आवश्यक त्या सेवासुविधांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे इतर मजले बंद स्थितीत आहे. 

या रुग्णालयात सुमारे २०० बेडसचे कोविड केअर सेंटर उभारणे शक्य आहे. ते सुरू झाल्यास कोथरूड, वारजे, कर्वेनगर या उपनगरातील नागरीकांना दिलासा मिळणार आहे. तरी त्या उर्वरित जागेचा योग्य वापर करुन रुग्णांना दिलासा द्यावा, असे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT