Student 
पुणे

पुण्यात होणार चार जानेवारीला राज्यस्तरीय युवा संसद 

सकाळवृत्तसेवा

पुणे - केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयातर्फे येत्या 13 जानेवारी रोजी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रीय युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर या अभियानाची राज्य पातळीवरील स्पर्धा चार जानेवारी रोजी नेहरू युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय कार्यालय यांच्या वतीने गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्‍स अँड इकॉनॉमिक्‍स येथे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

युवकांनी सामाजिक प्रश्न जाणून त्यांचा सखोल अभ्यास करावा, त्यांच्या वक्‍तृत्त्व कौशल्यात भर पडावी, या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत राज्यातील एकूण 34 जिल्ह्यातून जिल्हास्तरीय युवा संसदेतून प्रथम आणि द्वितीय क्रमांकाने विजयी ठरलेले असे एकूण 68 स्पर्धक सहभागी होणार आहेत.

राज्यस्तरीय युवा संसदेत प्रथम आलेल्या स्पर्धकास संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात होणाऱ्या राष्ट्रीय युवा संसदेत प्रत्यक्ष बोलण्याची तर, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकास राष्ट्रीय युवा संसदेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. राष्ट्रीय पातळीवर विजयी होणाऱ्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या स्पर्धकांना अनुक्रमे दोन लाख, दीड लाख आणि एक लाख रुपये अशी पारितोषिके दिली जाणार आहेत. 

उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे राज्यस्तरीय युवा संसदेत ऑनलाइन उपस्थित राहणार आहेत. नेहरू युवा केंद्र संघटनचे राज्य संचालक पी. पी. हिंगे आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय संचालक डी. कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय युवा संसदेचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हा युवा अधिकारी यशवंत मानखेडकर यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

APL 2026: Asian Games मध्ये पदकांची लूट करणारे भारतीय तिरंदाज पुन्हा सज्ज! कधी अन् कुठे पाहाता येणार भारतीय तिरंदाज

MPSC Student Agitation : टिळक चौकातील आंदोलनाकडे नेत्यांची पाठ; उणिवा दुरुस्त करा, पण पद्धत बदलू नका; विद्यार्थ्यांची भूमिका

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Hingoli Fire Tragedy : हिंगोलीत फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; महिला आणि मुलासह दोघांचा मृत्यू, नगर परिषदेचे कर्मचारी गंभीर भाजले!

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT