pcmc
pcmc sakal
पुणे

चोर, दरोडेखोर असा कलंक पुसायचाय

पीतांबर लोहार

पिंपरी : कुठेही चोरी झाली. लूटमार झाली किंवा दरोडा (crime) पडला की, पोलिस आमच्या वस्तीत यायचे. धरपकड करायचे. मारहाण करायचे. गुन्हा केलेला नसतानाही विनाकारण त्रास व्हायचा. त्यामुळे आम्ही मुंबईत गेलो. वडिलांसोबत राहून फुलांचे हार, गजरे विनायला शिकलो. चौकात थांबून ते विकू लागलो. पण, गेल्या वर्षी लॉकडाउनमुळे नुकसान झाले. रस्त्यावर गाड्याच नव्हत्या. पोलिसही थांबू देत नव्हते. म्हणून गावी गेलो. तिथेही रोजगार (employment) नव्हता. उधार-उसनवार करून दिवस काढले. देणेकरी पैसे परत मागू लागले. रोजगार हवा होता. त्यासाठी सात-आठ महिन्यांपूर्वी पुण्यात आलोय. चौकाचौकांत थांबून फुले, हार, गजरे विकून गुजरान करतोय. चोर, लुटारू, दरोडेखोर हा कलंक (thief or a robber) आम्हाला पुसायचाय, ही भावना आहे भटक्या जमातीतील धरम पवार यांची. (The stigma of being a thief or a robber is removed)

चोरी, लूटमार, दरोडेखोर असा बट्टा या जमातीला लागला आहे. अनेक चित्रपटांमध्येही अशाच व्यक्तिरेखा रंगविल्या गेल्या आहेत. अनेकांच्या मुखी तशी वंदताही आहे. पोलिसांच्या तपासातही ते गुन्हेगार आढळले आहेत. त्यामुळे जमातीतील सर्वांकडेच त्या नजरेने पाहिले जाते. मात्र, हाताची पाचही बोटे सारखी नसतात, तशी एखाद्या जमातीतील सर्वच माणसंही गुन्हेगार नसतात, हेच सत्य.

सत्याच्या मार्गावर चालणारं कुटुंब असं धरम पवार यांच्या कुटुंबाला म्हणावे लागेल. मुंबई-पुणे महामार्गावर नाशिक फाटा चौकात भोसरीकडे वळणाऱ्या मार्गिकेच्या कडेला दोन खांबांना दोरा बांधून धरम हे चाफ्याच्या फुलांचे हार तयार करताना दिसले. जवळच झाडाखाली त्यांची पत्नी मीना फुलांचे गजरे तयार करत होती.

अडीच-तीन वर्षांची मुलगी वडापाव खात होती. उत्सुकता म्हणून थांबलो. कारण, त्यांना पहिल्यांदाच बघत होतो. ऐरवी सिग्नलला थांबून भीक मागणारे दिसतात. पण, भर दुपारी बाराच्या सुमारास गजरे, हार विणने पहिल्यांदाच बघत होता. धरम यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या दोन मुली सिग्नलवर थांबलेल्या होत्या. एक आठ-नऊ तर, दुसरी दहा-अकरा वर्षांची असेन. त्यांच्या हातात गुलाबाची फुले, गुच्छ, गजरे होते. छोटी मुलगी आली. दहा रुपये मीना यांच्याकडे दिले व पाणी पिऊन पुन्हा सिग्नलकडे गेली. थोड्या वेळाने मोठी मुलगी आली. सिग्नलवर उभी राहून ती दमली होती.

तिचे तिसरीपर्यंत शिक्षण झालेले. ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभूने यांनी भटक्या विमुक्त जमातीतील मुलांसाठी सुरू केलेल्या चिंचवड येथील गुरुकुलमध्ये राहून ती शिकत होती. पण, दोन वर्षांपूर्वी तब्बेत बरी नसल्याने तिला घेऊन धरम मुंबईला गेले. तेव्हापासून तिची शाळाच सुटली. तिला हिशेब कळतो. पण, धरम व मीना यांना अक्षर ओळखही नाही. केवळ अनुभवाच्या जोरावर ते आकडेमोड करतात. पुण्यातील मार्केटयार्डमधून फुले आणतात. त्यांचे गजरे व हार करून दोन पैसे कमवतात. त्यांना चार मुली आहेत. तीन सोबत राहतात. एक मुलगी गावी बार्शी येथे आजीकडे राहते.

कुटुंबच बनलंय फुलवाले

धरम पवार व त्यांचे कुटुंब वडारवस्तीत राहायला आहे. नाशिक फाटा येथे येण्यापूर्वी त्यांच्या भावासोबत ते फर्ग्यूसन रस्त्यावरील संत ज्ञानेश्‍वर पादुका चौकात फुले, हार विकायचे. पण, एकाच ठिकाणी दोघांनी थांबण्यापेक्षा धरम दररोज सकाळी नाशिक फाटा चौकात येतात. सायंकाळी पुन्हा वडारवस्तीत मुक्कामाला जातात.

धरम म्हणाले, ‘‘फुलांचे हार, गजरे बनवायला वडिलांनी शिकवले. तेही मुंबईत हाच व्यवसाय करायचे. माझी बहीण पिंपरी चौकात थांबून फुले, हार विकते. ‘कष्टाने कमवून खा,’ ही शिकवण वडिलांनी दिली आहे. मुलीला शिकवायचे होते. पण, आजारपणामुळे तिला शिकवता आले नाही. आणि आता कोरोनामुळे शाळाही बंद आहेत.’’

मुंबईत आम्ही ग्रॅंटरोडला रहायचो. आधी लोकलमध्ये फिरून फुले, गजरे विकायचो. पण, पोलिस आले की दोन हजार रुपये दंड करायचे. नाही तर जवळचे असलेले सर्व पैसे घेऊन जायचे. कधीकधी मारायचेही. त्यामुळे सिग्नलला थांबून फुले, गजरे विकू लागलो. लॉकडाउनमुळे पुण्यात आलोय.

- मीना पवार,

फुले व गजरे विक्रेती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT