ZP_Pune_Shivrajyabhishek 
पुणे

पुणे : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त झेडपी मुख्यालयात उभारली स्वराज्य गुढी!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात शनिवारी (ता.६) 'स्वराज्य गुढी' उभारण्यात आली. 

प्रारंभी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि पंचायतराजचे जनक यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वराज्य गुढी उभारण्यात आली. 

यावेळी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, कृषी सभापती बाबूराव वायकर, महिला व बालकल्याण सभापती पुजा पारगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, संदीप कोहीनकर, शांताराम इंगवले, शिवजयंती महोत्सव समितीचे अमित गायकवाड, अनिल पवार आदी उपस्थित होते.

दरवर्षी ६ जून हा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यात आहे. त्यामुळे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासमोर स्वराज्य गुढी उभारण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने चार वर्षांपूर्वी घेतलेला आहे.

यासाठी जिल्हा परिषदेच्या १९ डिसेंबर २०१६ च्या विशेष सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार मागील ४ वर्षांपासून जिल्ह्यातील पंचायतराज संस्थांच्या मुख्यालयासमोर ही स्वराज्य गुढी उभारण्यात येत आहे. 

मात्र यंदा कोरोना विषाणू संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ग्रामपंचायत आणि पंचायत समिती मुख्यालयासमोर ही गुढी उभारता आली नाही. परंतू प्रतिनिधिक स्वरुपात जिल्हा परिषद मुख्यालयासमोर उभारण्यात आली.

पुढच्या वर्षी संपूर्ण पुणे जिल्ह्यात मोठ्या दिमाखात हा सोहळा साजरा करण्यात येईल आणि राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुख्यालयासमोर स्वराज्य गुढी उभारण्यासाठी पुणे जिल्हा परिषद सरकारकडे आग्रह धरेल, अशी ग्वाही अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी यावेळी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा, मध्यरात्री तरूणीला फार्महाऊसवर बोलवून गैरकृत्य

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT