Swargate will be developed due to multimodel hub says MLA Madhuri Misal 
पुणे

Vidhan Sabha 2019 : मल्टीमॉडेल हब मुळे स्वारगेटचा होणार कायापालट : मिसाळ

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील नागरिकांना एकाच छताखाली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी एक हजार सहाशे कोटी रुपये खर्च करून स्वारगेटला "मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्ट हब' उभारण्याचे काम सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर सुरू झाले असून, या प्रकल्पामुळे स्वारगेटचा कायापालट होईल, असा विश्‍वास आमदार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला. 

पर्वती विधानसभेच्या भाजप महायुतीच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांच्या प्रचारार्थ अप्पर इंदिरानगर परिसरात पदयात्रा काढण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या. नगरसेवक बाळा ओसवाल, रुपाली धाडवे, वर्षा साठे, सुनिता चिंतल, गोपाळ चिंतल, भीमराव साठे, विकास लवटे, दिनेश धाडवे, जयश्री तोडकर, सागर वाल्हेकर, गौरव घुले, विनीत पिंगळे, शशी ापळ, बाबुराव घाडगे, नीता थोरवे, अनिता दीक्षित, गणेश हणमघर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

माधुरी मिसाळ यांना धक्काही लागू देणार नाही; पंकजा मुंडे यांनी दिला शब्द

मिसाळ म्हणाल्या, स्वारगेट येथील मेट्रोच्या भुयारी स्टेशनपासून थेट राज्य परिवहन महामंडळाच्या स्थानकापर्यंत प्रवाशांना नेण्यासाठी स्वतंत्र मार्ग, एसटीसह पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसच्या स्वारगेट स्थानकात ये-जा करण्यासाठी स्वतंत्र मार्ग, दुचाकी, रिक्षा आणि सायकलीसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग अशा स्वप्नवत वाटणाऱ्या कल्पना प्रत्यक्षात येणार आहेत. 

पर्वती कोणाची वहिनींची की ताईंची ?

मिसाळ पुढे म्हणाल्या, या प्रकल्पामुळे स्वारगेटच्या जेधे चौकातील वाहतुकीची कोंडी कमी होणार आहे. याचा ायदा पर्वती मतदारसंघासाठी होणार आहे. तसेच मेट्रो प्रवासाबरोबर सार्वजनिक वाहतूक प्रवास आर्थिकदृष्ट्या ायदेशीर ठरणार आहे. नागरिकांसाठी शॉपिंग मॉल, कमर्शिअल कॉम्प्लेक्‍स उभारले जाणार आहेत. देशातील नंबर एकचे ट्रान्सपोर्ट हब तयार करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT