Take care in the rainy season about Electricity Accident 
पुणे

वीज दुर्घटनेपासून सावधान! पावसाळ्यात 'अशी' घ्या काळजी

सकाळवृत्तसेवा

पुणे : पावसाळ्यात अतिवृष्टी, पूर, झाडे व फांद्या कोसळल्याने वीज तारा तुटणे, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्किट आदींमुळे अपघात होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
अतिवृष्टी व वादळी पावसामुळे तुटलेल्या वीज तारा, वीज खांब, रस्त्याच्या बाजूचे फिडर पिलर, रोहित्रांचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्‍स तसेच घरातील ओलसर विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीच बोर्ड, विद्युत यंत्रणेजवळील इतर ओलसर वस्तू, साहित्य आदींमुळे अपघात होण्याची शक्‍यता वाढते. त्यामुळे ग्राहकांनी खबरदारी घेण्यासह सतर्क राहण्याची गरज आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे झाडे, फांद्या वीज तारांवर पडतात. यामुळे खांब वाकतात, तारा तुटतात. लोंबकळत राहतात. परंतु, त्यामध्ये वीज प्रवाह असण्याची शक्‍यता असते. अशा वीज तारांना हात लावण्याचा किंवा त्या हटविण्याचा प्रयत्न करू नये. अनेकदा रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो, तेव्हा नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले.

कोरोनाला रोखण्यासाठी पुणे पोलिसांचे आणखी एक पाऊल; नागरिकांच्या प्रवासावर येणार...

काय काळजी घ्यावी
- स्वीच बोर्ड, विजेच्या उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही
- घरातील वीजपुरवठ्याला अर्थिंग केल्याची खात्री करावी
- दूरचित्रवाणीची डीश, अँटेना वीज तारांपासून दूर ठेवा
- ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये
- सर्व वीज उपकरणे स्वीच बोर्डपासून बंद करा
- विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत
- खांबांना दुचाकी टेकवून ठेवू नये
- वीज तारांजवळ कपडे वाळत घालू नयेत
- फिडर पिलर्स, रोहित्र किंवा इतर वीज यंत्रणेपासून सुरक्षित अंतर ठेवावे


'पुणेरी पाटी'ने सुरु केलं ऑनलाइन युद्ध, विषय हैदराबादी बिर्याणीचा 

तक्रार येथे करा
टोल फ्री क्रमांक : 1912 , 1800-102-3435 किंवा 1800-233-3435
मोबाईल ऍप, वेबसाइट : www.mahadiscom.in
नोंदणी केलेल्या मोबाईलवरून 022-41078500 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या.
नोंदणी केलेल्या मोबाईलवरून NOPOWER हा एसएमएस 9930399303 यावर पाठविल्यास तक्रार नोंदविली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News : कारागिराने जबड्यात लपविले 15 लाखांचे सोने, पण 'या' एका चुकीमुळे उघड झाली चोरी

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

SCROLL FOR NEXT