पुणे : दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला, तरी पालक मुलांना शाळेत पाठवतील का? याबाबत शिक्षक साशंक आहेत. शाळा सुरू झाल्यास पालक पाल्यांना शाळेत जाण्याची अनुमती देणार नसल्याचे ३६.८ टक्के शिक्षकांचे म्हणणे आहे.
राज्यातील साडेपाचशेहून अधिक शिक्षकांच्या मतांची पडताळणी केली असता, शाळा सुरू करण्याचा निर्णय योग्य असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. मुंबईतील माध्यमिक शाळेचे शिक्षक जयवंत कुलकर्णी यांनी गूगल फॉर्मद्वारे एक सर्वेक्षण केले आहे. त्यात राज्यातील शिक्षकांची मते जाणून घेण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात शाळांना भेडसावलेल्या अडचणी, ऑनलाइन शिक्षण, दहावी-बारावीच्या परीक्षा अशा मुद्द्यांवर शिक्षकांनी आपली मते नोंदविली आहेत.
यात शाळा सुरू करण्याचा निर्णय योग्य असल्याचे ६१ टक्के शिक्षकांचे म्हणणे आहे. तर शाळा सुरू करण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे जवळपास १८ टक्के शिक्षकांनी सांगतिले. मात्र आताच काही सांगता येणार नाही, असे २१ टक्के शिक्षकांचे म्हणणे आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता, राज्य सरकारने इयत्ता पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी केला आहे. हा अभ्यासक्रम अजून कमी करण्याची गरज नसल्याचे ५७.३ टक्के शिक्षकांचे म्हणणे आहे. तर बोर्डाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा बदलण्यात यावा असे ५८.२ टक्के शिक्षकांनी नमूद केले आहे.
दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्यास पालक मुलांना शाळेत पाठवतील का?
- होय : २३.९ टक्के
- नाही : ३९.३ टक्के
- सांगता येत नाही : ३६.८ टक्के
बोर्डाच्या परीक्षेसाठी शाळा/महाविद्यालय आणि राज्य मंडळाने कोणते मूल्यमापन वापरावे?
- ४० टक्के शाळा/महाविद्यालय आणि ६० टक्के बोर्ड : १७ टक्के
- ५० टक्के शाळा/महाविद्यालय आणि ५० टक्के बोर्ड : ३९ टक्के
- ६० टक्के शाळा/महाविद्यालय आणि ४० टक्के बोर्ड : १२ टक्के
- प्रचलित मूल्यमापन रचनेत कोणताही बदल करू नये : ३२ टक्के
ऑनलाइन अध्यापनात सर्वाधिक भेडसावणारी समस्या :
- इंटरनेट/नेटवर्कचा अभाव : २३.९ टक्के
- विद्यार्थी अनुपस्थिती : २७.१ टक्के
- विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नसणे : ३१.१ टक्के
- अन्य : १७.९ टक्के
"दिवाळीनंतर प्रत्यक्ष शाळा आणि महाविद्यालये सुरू करावीत का? याबाबत सर्वचजण द्विधा मनस्थितीत असल्याचे चित्र आहे. त्याबरोबरच दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा याबाबत शिक्षकांची मते जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले."
- जयवंत कुलकर्णी, सहाय्यक शिक्षक, गांधी बाल मंदिर हायस्कूल, कुर्ला
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.