पुणे

बारावीच्या प्रश्नपत्रिकांचा आराखडा नसल्याने शिक्षकांच्या अडचणी वाढल्या

मीनाक्षी गुरव

पुणे : बारावीचा अभ्यासक्रम यंदाच्या वर्षापासून बदलण्यात आला आहे. नवीन अभ्यासक्रम एकमेकांशी चर्चा करून शिक्षक अध्ययन करत आहेत. मात्र अद्याप बारावीच्या विषयांच्या कृतिपत्रिका/प्रश्नपत्रिकांचा आराखडा अद्याप प्रसिद्ध न झाल्याने विद्यार्थ्यांकडून सराव कसा करून घ्यायचा, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.

बारावीचा अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बदलला असून नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. साधारणपणे अभ्यासक्रम बदलल्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर पडले. अभ्यासक्रम नवीन असल्याने आतापर्यंत शिक्षकांनी आपल्या सहकारी शिक्षकांच्या मदतीने अध्ययन सुरू ठरवले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे या विद्यार्थ्यांना ऑनलाइनद्वारेच धडे दिले जात आहेत. अन्यथा दरवर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत बारावीचा ७५ टक्के अभ्यास शिकवून पूर्ण झालेला असतो आणि झालेल्या अभ्यासाची उजळणी विद्यार्थी करू लागतात. मात्र यंदा बदलेल्या अभ्यासक्रमातील कृतिपत्रिका/प्रश्नपत्रिकांचा आराखडा अद्याप जाहीर न केल्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या पेचात पडले आहेत. अद्याप हा आराखडा प्रसिद्ध न झाल्याने सराव परीक्षा नेमकी कशी घ्यावी, याचा अंदाज येत नसल्याने शिक्षकांचा गोंधळ उडत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

बारावीच्या नव्या अभ्यासक्रमात कृतिशीलतेला वाव देण्यात आला आहे.  त्यामुळे सराव परीक्षा नेमकी घ्यायची कशी असा प्रश्न शिक्षकांना आणि परीक्षेची तयारी कशी करायची असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. बारावीच्या कृतिपत्रिका/प्रश्नपत्रिका आराखडा उपलब्ध करून द्यावा, म्हणजे सराव परीक्षा घेणे सोपे होईल, अशी मागणी आता शिक्षक करत आहेत.

इयत्ता बारावीच्या एकूण ५८ विषयांपैकी २२ विषयांच्या कृतिपत्रिका/प्रश्नपत्रिकांचा आराखडा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. उर्वरित विषयांच्या कृतिपत्रिका/प्रश्नपत्रिकांचा आराखडा
 मान्यता मिळाल्यानंतर येत्या आठवड्यापर्यंत संकेतस्थळावर अपलोड केले जातील.-डॉ. अशोक भोसले, सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

बारावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा घेण्याची यंदाचे हे पहिलेच वर्ष आहे. त्यामुळे नव्या अभ्यासक्रमाप्रमाणे विद्यार्थ्यांकडून परीक्षेसाठी सराव करून घेताना कृतिपत्रिका/प्रश्नपत्रिकांचा आराखडा उपयुक्त ठरतो. हा आराखडा लवकरात लवकर उपलब्ध झाल्यास शिक्षकांना विद्यार्थ्यांकडून परीक्षेची तयारी करून घेणे आणि विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करणे सोपे जाणार आहे.-पूजा जोग, मुख्याध्यापक, रेणुका स्वरूप गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT