Technical education examination from 9th July 
पुणे

तंत्रशिक्षण मंडळाकडून वेळपत्रक जाहीर; 'या' तारखेपासून होणार परीक्षा

सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्यातील तंत्रनिकेतन, औषधनिर्माण पदविका अभ्यासक्रमासह पाच अभ्यासक्रमांच्या शेवटच्या सत्राच्या व शेवटच्या वर्षीची परीक्षा ९ जुलैपासून परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सहा सत्राच्या पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील सहावे सत्र, दोन वर्षाच्या औषधनिर्माण अभ्यासक्रमातील द्वितीय वर्ष, तीन वर्षाच्या मायनिंग अभ्यासक्रमातील तृतीय वर्ष, आठ सत्राच्या पार्टटाईम पदविका अभ्यासक्रमातील आठवे सत्र आणि शासन मान्य अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमाचे  अंतीम सत्र/वर्ष यांच्या परीक्षांचे नियोजन तंत्र शिक्षण मंडळाने केले आहे. 'कोरोना'मुळे राज्य सरकारने सर्व अभ्यासक्रमाच्या शेवट्या सत्र किंवा वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर तंत्रशिक्षण मंडळाच्या विद्वत समितीची बैठक १४ मे रोजी पार पडली. त्यामध्ये या परीक्षा कशा घ्यायचे याचे नियोजन करण्यात आले. मंडळाचे संचालक डाॅ. विनोद मोहितकर  यांनी यासंदर्भात शुक्रवारी (ता.१५) परिपत्रक काढले आहे. 

- हृदय पिळवटून टाकणारी कहाणी : '...ते माहीत नाही, पण आमचे मात्र कुटुंब उद्‌ध्वस्त झाले'

ज्या शेवटच्या सत्राच्या/वर्षाच्या विद्यार्थ्यांचे काही विषय बॅकलाॅग राहिले आहेत त्यांची परीक्षा १ ते ८ जुलै दरम्यान होणार आहे. ही परीक्षा संस्था स्तरावर घेण्यात येणार आहे. 
अंतीम सत्र/ वर्षाचा १३ मार्च पर्यंत ९० टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला होता. त्यावरून परीक्षा घेतली जाईल  व गुण दिले जाणार आहेत. तर, इतर सत्राच्या/वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नसल्याने त्यांना पुर्वीच्या सत्राच्या गुणांवर व चालू सत्रातील कामगिरीवर अंतर्गत मूल्यांकन केले जाईल. त्यानुसार त्यांना गुण देऊन उत्तीर्ण केले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश तृतीय सत्रात किंवा पाचव्या सत्रात होणार आहे. त्यांना त्यांचे प्रथम  द्वितीय व तृतीय सत्रातील बॅकलाॅग  राहिलेल्या विषयात २०२०-२१ च्या पहिल्या सत्रात उत्तीर्ण होणे अनिवार्य आहेआहे. 

शिफ्ट संपली की जबाबदारी संपली; पुण्यात खाकी वर्दीच्या बेपर्वाईने 'त्या' रुग्णाचा मृत्यू

इतर सत्र/वर्षाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष १ ऑगस्टला सुरू होणार आहे. तर, नव्याने प्रथम सत्र/वर्षाला प्रवेश घेणाऱ्यांचे वर्ग १ सप्टेंबर रोजी सुरू होतील, असे परिपत्रकात नमूद केले आहे.

पुण्यावर नामुष्की : ऍम्ब्युलन्स न आल्यानं रस्त्यावर एकाचा मृत्यू |

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Price Hike : दूध महागणार! १ सप्टेंबरपासून प्रतिलिटर ९ रुपयांची वाढ; नवा दर किती?

Devdutta Padikkal Tattoo: बाबो! जर्सीचा नंबर अन् नाव थेट पाठीवर! पडिक्कलच्या टॅटू पाहून चाहतेही चक्रावले, म्हणाले, ‘ अरे हे काय!’

Animal Feed Poisoning: पशुखाद्यातून विषबाधा; गोणेवाडीत दोन जनावरे दगावली, दोन गंभीर; पशुपालकाला मोठा आर्थिक फटका

Marathi News Live Updates : रक्षाबंधनानिमित्त रामदास आठवलेंची कामाठीपुराला भेट; महिलांनी बांधली राखी

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात माणुसकीला लाज आणणारी घटना! मृत महिलेच्या कानातील सोन्याचे दागिने चोरले; VIDEO VIRAL होताच संतापाची लाट

SCROLL FOR NEXT