Pune sakal
पुणे

Pune: केंद्राच्या कायद्याला कुरकुंभमध्ये विरोध; वाहतूक ठप्प

सावता नवले

केंद्र सरकारने नवीन वाहन कायद्यात बदल करून अपघात झाल्यानंतर वाहनचालक पळून गेल्यास त्यास सात लाख रूपये दंड भरावा लागणार आहे. या कायद्याला वाहनचालकांनी कडाडून विरोधत करीत सोमवारी ( ता.१ ) दुपारी दौंड तालुक्यातील खडकी येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टायर पेटून पुण्याकडे जाणारी लेन बंद केल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. ही घटना घडून खूप वेळ उलटूनही घटनास्थळी पोलिसांचा व इतर यंञणाचा पत्ता नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

दौंड तालुक्यातील खडकी हद्दीतील सोनारनाला व बबीदा ढाबा परिसरात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टायर पेटून केंद्र सरकारच्या नवीन वाहन कायद्याचा वाहनचालकांनी निषेध करून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. या जुन्या वाहन कायद्यात बदल करून अपघातानंतर चालक पळून गेल्यास त्याला सात लाख रूपये दंड भरावा लागणार असल्याचा कायदा करण्यात आला आहे.

हा कायदा वाहनचालकांवरती अन्याय करणारा असून दुसऱ्याच्या वाहनावर चालक म्हणून काम करणाऱ्यांना ही दंडाची रक्कम भरणे अशक्य आहे. सात लाख रूपये दंड भरण्याची आमची परिस्थिती असती तर दुसऱ्याच्या वाहनावर कामाला राहीलो असतो का असा संतप्त सवाल वाहनचालकांनी उपस्थित केला. तर काही वाहनमालकांनी आम्ही कर्ज काढून वाहने घेतली असून आम्ही स्व:ता चालक आहे. वाहनाचे हप्ते, डिझेलचे भाव मोठ्याप्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा व्यवसाय परवडत नाही. त्यामध्ये वाहनांचे अपघात, नादुरूस्त झाल्यास खर्चात आणखी भर पडते.

या नवीन जाचक कायद्याने दंडाची रक्कम भरण्याने वाहनमालक व चालकांचे कंबरडे मोडणार असून हा व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ ओढवणार असून उद्रेक होईल अशा तीव्र प्रतिक्रिया वाहनचालकांनी व्यक्त केल्या. हा दंडाचा जाचक कायदा त्वरित रद्द करावा अशी मागणी करण्यात येत आहे. जोपर्यंत हा कायदा रद्द होत नाही तोपर्यंत वाहनचालक संप करतील असा इशाराही वाहनचालकांनी दिला. या चालकांनी सोलापूरकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर टायर पेटवल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठयाप्रमाणात गैरसोयला तोंड द्यावे लागत आहे. घटनास्थळी पोलिस व इतर यंञणा न आल्याने वाहतूक सुरळीत करण्यास उशिर होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT