पुणे

फोटो काढत, निसर्ग न्याहाळत विस्टाडोममधून करा प्रवास!

मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

पुणे ः पुणे- मुंबई मार्गावर येत्या शनिवारपासून (ता. २६) डेक्कन एक्स्प्रेस सुरू होणार आहे. त्यात आधुनिक सुविधा असलेला एक विस्टाडोम कोच असेल. त्यामुळे प्रवासादरम्यान निसर्ग सौदर्याचा आस्वादही प्रवाशांना घेता येईल. मात्र, त्यासाठी थोडीशी जादा रक्कमही प्रवाशांना मोजावी लागेल.

डेक्कन एक्स्प्रेसचा शेवटचा डबा म्हणजे विस्टाडोम कोच असेल. मोठ्या खिडक्या, काचेचे छत, फिरणारी पुश- बॅक खुर्ची आदी सुविधांचा समावेश असलेल्या या कोचमध्ये प्रवाशांना उभे राहूनही प्रवासाचा आनंद घेता येईल. त्या ठिकाणी तिन्ही बाजूनी काचा असतील. ही गाडी दिवसा धावणार असल्यामुळे फोटो टिपत निसर्ग न्याहाळत प्रवास होऊ शकतो. मध्य रेल्वेत विस्टाडोमचे दोनच कोच आले असून त्यातील एक डेक्कन एक्स्प्रेसला जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. दुसरा कोच मुंबई - मडगाव मार्गावरील जन्मशताब्दी एक्स्प्रेसलाजोडण्यात आला आहे. डेक्कन एक्स्प्रेसला १५ डबे असतील. त्यात तीन एसी चेअरकार, ११ सेकंड क्लास सिटींग आणि विस्टाडोम कोच असेल. प्रवाशांना विस्टाडोम कोचमध्ये बसायचे असेल तर त्याचे आरक्षण करावे लागेल. त्यासाठी इतर डब्यांच्या तुलनेत अधिक भाडे असेल.

डेक्कन एक्स्प्रेस (क्र. ०१००७) २६ जूनपासून सुरू होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी ७ वाजता ही गाडी निघेल आणि सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी पुण्याला पोचेल. पुण्यावरून ही गाडी (क्र. ०१००८) दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी निघेल आणि सायंकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी मुंबईला पोचेल. दादर, ठाणे, कल्याण, नेरळ, लोणावळा, तळेगाव, खडकी आणि शिवाजीनगर स्थानकांवर ही गाडी थांबेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena–AIMIM Alliance: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! भाजपनंतर एकनाथ शिंदेंच्या शिनसेनेची देखील AIMIM सोबत युती

बंडखोरी भोवली! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या आदेशानंतर मालेगावात भाजपकडून दोन माजी महापौरांची पक्षातून हकालपट्टी

Latest Marathi News Live Update : पुणे भाजप माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टेंनी अजित पवारांची भेट घेतलीय

लोकशाहीची सुरवात पाश्चात्य देशात नाही तर भारतातील 'या' राज्यात झाली! CM योगी आदित्यनाथांनी दिले पुराव्यांसह उत्तर

Farmer Success Story: अंकितची केळी गेली साता समुद्रापार; युवा शेतकऱ्याच्या श्रमाला मिळाल फळ, अडीच एकरात लाखांचे उत्पन्न..

SCROLL FOR NEXT