डहाणूकर कॉलनी - एटीएम केंद्राबाहेर पडलेला अस्ताव्यस्त कचरा. 
पुणे

एटीएम सेंटर आहे कि कचरा कुंडी; नाक दाबूनच करावा लागतो व्यवहार

सकाळवृत्तसेवा

कोथरूड - डहाणूकर कॉलनी परिसरातील एका राष्ट्रीयकृत बॅंकेच्या एटीएम केंद्रात अतिशय घाण पसरलेली आहे. काही ग्राहकांकडून पान, तंबाखू खाऊन पिचकाऱ्या मारल्याने आत प्रवेश केल्यावर घाणेरडा वास येत आहे. त्यामुळे नाक दाबूनच आर्थिक व्यवहार करावा लागतो. बॅंकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून योग्य ती उपाययोजना करावी, अशी ग्राहकांची मागणी आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येथील एटीएम केंद्रात सुरक्षा रक्षक नाही, साफसफाई केली जात नसल्याने सर्वत्र कचरा अस्ताव्यस्त पडलेला आहे. या एटीएम केंद्राकडे संबंधित बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, असे महापालिकेचे मुकादम वैजिनाथ गायकवाड यांनी सांगितले.

गायकवाड म्हणाले की, येथे सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक नेमलेले होते. केंद्राच्या आतील बाजूस एसी, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षकांना कपडे बदलण्याची लहान केबिनची व्यवस्था होती. हा सुरक्षा रक्षक नागरिकांना पैसे काढण्यासाठी काही अडचण आली, तर समजून सांगायचा. प्रत्येक एटीएम केंद्र अतिशय स्वच्छ असायचे. आत निर्माण होणारा कचरा सुरक्षा रक्षक महापालिकेच्या घंटागाडीला देत होते, परंतु आता येथे सुरक्षारक्षक नसल्याने मोठ्या प्रमाणात कचरा साचत आहे.

कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांनी सांगितले की, या  एटीएम केंद्रातील साफसफाई व कचरा उचलण्याचे काम डहाणूकर कॉलनी कोठीतील सहकाऱ्यांनी केले. आता येथून पुढे एटीएम केंद्रात स्वच्छता ठेवली न गेल्यास संबंधित बॅंकेवर दंडात्मक कारवाई केली जाईल.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शेतकऱ्यांच्या DBT वर दसऱ्यापर्यंत मदत जमा करणार'; अजित पवार यांचे आश्‍वासन, सर्वांना सोबत घेऊन चालण्याचीही दिली ग्वाही

Pune Traffic App : वाहनचालकांवर मोबाईलवरूनच कारवाई, ‘पुणे ट्रॅफिक’ ॲपला प्रतिसाद; आतापर्यंत ४२ हजार तक्रारी

Shivram Bhoje Death : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगाव येथे आज होणार अंत्यसंस्कार

Latest Marathi News Updates : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगावात आज अंत्यसंस्कार

Mumbai Monorail : मुंबईकरांसाठी मोठी बातमी ! मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद , MMRDA ने का घेतला निर्णय ?

SCROLL FOR NEXT