manjari1.jpg 
पुणे

पुणे : राहत्या घरात "ते' दोघे अडकले विवाहबंधनात... 

सकाळवृत्तसेवा

मांजरी (पुणे) : लॉकडाऊन उठण्याची चिन्हे दिसत नसल्याने येथील उच्चशिक्षित वधूवरांनी राहत्या घरात स्वतःसह केवळ पाच जणांच्या उपस्थितीत विवाह उरकून घेतला. दरम्यान, सरपंच शिवराज घुले यांनी इमारती खाली ध्वनिवर्धकावरून गाणे वाजवून वधूवरांना शुभेच्छा देत सुखद धक्का दिला. अनपेक्षितपणे मिळालेल्या या शुभेच्छांनी भारावलेल्या नवदांपत्याने आनंद व्यक्त केला. 

सिद्धिविनायक प्राइड, मांजरी येथील अभियंता असलेला तरुण निखिल राऊत व शिक्रापूर (ता. शिरूर) येथील डॉक्‍टर तरुणी ऊर्मिला हिंगसे यांचा फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा झाला होता. मे महिन्यात 19 तारखेला विवाह करण्याचे ठरविले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांनी हा विवाह घरीच मर्यादित उपस्थितांमध्ये करण्याचे ठरविले. पोलिसांनी व ग्रामपंचायतीकडून त्यांना परवानगी देण्यात आली. वधू-वर, भटजी आणि वधूचे दोन नातेवाईक अशा पाच जणांच्या उपस्थितीत विवाह पार पडला. 

दरम्यान, सरपंच घुले यांनी कोरोनाविषयी जनजागृती करणारे ध्वनिवर्धक लावलेले वाहन इमारतीखाली आणून नवदांपत्याला गाणे वाजवून शुभेच्छा दिल्या. वधूवरांनी गॅलरीमध्ये येऊन खाली उपस्थित अनपेक्षित वऱ्हाडींना अभिवादन करीत आनंद व्यक्त केला.

"कुटुंबातील अनेक व्यक्तींना, नातेवाइकांना व मित्रपरिवाराला विवाहाला उपस्थित राहता आले नाही, याची रुखरुख आहे. मात्र, त्याचवेळी कोरोना व लॉकडाऊनच्या काळात झालेला हा विवाह अविस्मरणीय ठरणार असल्याचा आनंदही होत आहे", अशी भावना निखिल व डॉ. ऊर्मिला यांनी व्यक्त केली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

याचवेळी शेजारील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनीही टाळ्या वाजवून या दांपत्याला शुभेच्छा दिल्या. इमारती जवळ उपस्थित असलेले सरपंच घुले यांच्यासह सिद्धिविनायक पेट्रोलियमचे सागर रुकारी, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद कोद्रे, समीर घुले, बबन जगताप, गणेश गायकवाड, अमित गुंड, विशाल घुले, सोसायटीचे सेक्रेटरी नितीन चौधरी, ग्रामपंचायत व पेट्रोल पंपावरील कर्मचारी यांनी सोशल डिस्टन्स पाळून टाळ्या वाजवीत वधूवरांना शुभेच्छा दिल्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

AFG vs SL Live : 6,6,6,NB,6,6,1w! ४० वर्षीय मोहम्मद नबीची वादळ खेळी; ६ चेंडूंत केलेल्या ५ धावा, नंतर १६ चेंडूंत ५५ धावांचा पाऊस Video

Crime News : लोणी काळभोर येथील पाच अट्टल गुन्हेगार दोन वर्षासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण जिल्ह्यातून तडीपार

SCROLL FOR NEXT