Crime_Murder 
पुणे

चौकशी सुरू होती चोरीच्या गुन्ह्याची अन् त्यांनी कबुली दिली खुनाची!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे-सातारा रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना लुटण्यासाठी थांबलेल्या तिघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडे चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करीत असताना त्यांनी एका व्यक्तीचा खून केल्याचेही समोर आले आहे.

विशाल श्रीकांत जाधव (वय 32), गणेश यशवंत चव्हाण (वय 23), सुनील शंकर वसवे (वय 23, तिघेही रा. पापळ वस्ती, बिबवेवाडी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन कोयते, एक लायटर पिस्तूल या शस्त्रांसह मिरची पावडर, दोन मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 16 हजार 350 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. एस. जोंधळे यांनी त्यांना 14 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलिस नाईक उत्तम नंदकुमार तारू यांनी फिर्याद दिली आहे. सात ऑक्‍टोबर रोजी रात्री दहाच्या सुमारास पुणे सातारा रस्त्यावरील चौगुले इंडस्ट्रीज परिसरात तिघांना ताब्यात घेण्यात आले.

बिबवेवाडी येथील एका व्यक्तीला वरंधा घाटात नेऊन तेथेच त्याचेवर कोयत्याने वार करून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह तेथील दरीत फेकून दिल्याचे आरोपी सांगत असल्याचे सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आरोपींनी यापूर्वी पुणे-सातारा रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना लुटले आहे का, जप्त करण्यात आलेला ऐवज त्यांनी कोणाकडून आणला, दरोडा टाकण्यासाठी हजर असलेला आणि अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेला अटक आरोपींचा साथीदार दशरथ शिंदे आणि त्याचा मित्र याचा शोध घ्यायचा आहे. त्यामुळे त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी ऍड. जाधव यांनी केली.

तिघेही सराईत गुन्हेगार :
विशाल जाधव याविरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात 307 नुसार एक, गणेश चव्हाण विरुद्ध 307 नुसार एक आणि इतर दोन असे तीन गुन्हे दाखल आहेत. याखेरीज, फरार आरोपी दशरथ शिंदे याविरोधात शहरातील विविध पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, अपहरण, आर्म ऍक्‍ट असे एकूण 7 गुन्हे दाखल आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: दिवसभरात काय घडलं? वाचा सर्व अपडेट्स एका क्लिकवर

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT